टॉप बातम्या

कानडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : काल दि. ८ मार्च २०२४ ला ग्रामपंचायत कानडा च्या सरपंच सौ. सूषमाताई रूपेश ढोके यांच्या संकल्पनेतून महिला दिनाच्या निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा व महिला मार्गदर्शन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रथम सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रथम सकाळी ८ वा.मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली, यामधे 'अ' गट मुली ५ ते २० वयोगटातील व २१ ते पूढे वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला. मुलीमध्ये प्रथम पारितोषिक ११०१ रू.भूमी ढोके, द्वितीय पारितोषिक जानवी ऊईके, तृतीय पारितोषिक कांचन आस्कर, तर महिला 'ब' गट मधून प्रथम पारितोषिक श्रध्दा डाहूले, द्वितीय पारितोषिक मिनाक्षी बावने, तृतीय पारितोषिक स्नेहल फाले यांनी पटकाविले व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच कोमल धाबेकर, शिवणी (रेशीम शेती उद्योग), निलीमा विठ्ठल निकोडे, डोलडोंगरगाव (वनरक्षक पदासाठी चे परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातून मुली मधून प्रथम) यांचे शाल व पूष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात दूपारी २ वाजता महिला मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाला, मार्गदर्शक म्हणून सिमा बांब्रटकर (व्यवस्थापक लोकसंचालीत साधन केंद्र आर्णी) ह्या होत्या. प्रमूख उपस्थिती कविता झीले ग्रामपंचायत सदस्य, रेखा आस्कर ग्रामपंचायत सदस्य, कल्पना मरसकोल्हे C R P बचत गट, अर्चनाताई धोबे, अल्काताई चामाटे, गीता झीले, सुवर्णाताई डाहूले, व गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();