सह्याद्री चौफेर | चेतन पवार
दारव्हा : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्याच्या हरू येथील वसंत विमुक्त जाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेने १९ वर्षीय खो-खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्पर्धेतील स्थान पक्के केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ तसेच जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय खेड व क्रीडा स्पर्धेमध्ये वसंत विमुक्त जाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हरू येथील १९ वर्षीय खो-खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. याशिवाय याच शाळेतील १९ वर्षाखालील चारशे मीटर रनिंगमध्ये भावेश बावने, आठशे मीटर रनिंगमध्ये गोपाल वानखडे, तीन किलोमीटर रनिंग स्पर्धेमध्ये प्रणय टीचुकले तालुक्यात प्रथम आले. त्यामुळे या तिघांचीही जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. स्पर्धेमधील सर्व यशस्वी विद्यार्थी व प्रशिक्षक शिक्षकांचे प्राचार्य राजेंद्र मांगे, बंडू पाटील सरतापे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.