थांबायचं नाव घेत नाही अवैध वाळूचा गोरखधंदा


सह्याद्री चौफेर : रवी घुमे 

मारेगाव : तालुक्यातील होणाऱ्या अवैध रेती तस्करीवर स्थानिक प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात चिंचमंडळ परिसरात दोन ट्रॅक्टर वर कारवाई केली होती. परंतु मारेगाव तालुक्यातील अजूनही रेती तस्करी वर पाहिजेत तसे नियंत्रण स्थानिक प्रशासन आणू शकले नसल्याचे बोलल्या जात आहे. 

मारेगाव शहरासह ग्रामीण भागात रेती चोरीला उधाण आले असून रात्रीचा फायदा घेत कोसारा, शिवणी, चनोडा, चिंचमंडळ, आपटी, मुकटा या रेती घाटातून खुलेआम रेती तस्करी केले जाते हे सर्वश्रुत असतांना देखील यावर का अंकुश ठेवण्यात प्रशासन सफसेल फेल होत आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
        (चिंचमंडळ येथील शेतातून रस्ता केल्याचे क्षणचित्रे)

बरं याबाबत असेही एकावयास मिळते की, गांव राजकीय पुढारी यात गुंतल्याचे, शुब्र घालून त्या आड गोरखधंदा चालवायचा. या धंद्यात आपापल्या परिसरातील आपला परिसर वाटून घेत "तू इकडे नको, मी तिकडे नाही" अशी चर्चा आहे. जर एल ओ सी झालंच तर त्याचा 'करेक्ट कार्यक्रम' करून गुपचूप राहायचं. परंतु यात बहुतांश हात ओले असल्याने नेमका कारवाईचा बडगा कसा राबवायचा, हा पेच'च आहे. याआधी अनेक थरारक प्रसंग अधिकाऱ्यांनी झेललेले आहेत. त्यामुळे ही भीतीच, माध्यमातून आपण वाचलेले आहे.

तूर्तास तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून स्थानिक प्रशासन याला आळा घालू शकत नाही. त्यामुळे गरजूना वाळू मिळणं अवघड झाले असून तगड्या भावात हिच रेती घ्यावी लागत असून लाभार्थ्यांचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे रेती तस्करी, अवैध दारू व तस्करांवर अंकुश ठेवायचे असेल तर "ड्रोन" चा वापर केल्या शिवाय मार्ग नाही, राज्यात अवैध तस्करी वर काही ठिकाणी याचा वापर केला गेला असून तोच प्रयोग मारेगाव तालुक्यात केला तर निश्चित अवैध धंद्यावर आळा बसेल...!