सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : मानवी दिव्यांगत्व हे मानव शारीरिक अभावत्व आहे,त्यामुळं माणसाला माणसासाठी त्याच्या भविष्यासाठी चांगले करण्याची प्रेरणा मिळत असते त्यामुळे दिव्यांगत्व ही आमच्यासाठी कृतीसिध्द प्रेरणा ठरते,असे मत जागतिक दिव्यांग दिनावर बोलतांना अ.भा.संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गीत घोष यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी चौक वणी येथे,रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय चिखलगाव च्या वतीने दि.३ डिसेंबर २०२२ ला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी चाटसे मॅडम (ठाणेदार पोलीस स्टेशन वणी) व मेघराज भंडारी, अर्जुन लोढा इतर मान्यवर, दिव्यांग विद्यार्थी यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर, लुईस ब्रेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व या महामानवांना अभिवादन करून सुरुवात सुरु करण्यात आला. या प्रसंगी आपले मत व्यक्त करताना मा.गीत घोष म्हणाले की, मला व्यंगत्व या माझ्या समोर असणाऱ्या मुलांमध्ये दिसत नसून त्यांच्याकडे बघणाऱ्या आपल्या दृष्टीकोणाचा भाग आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन सकारात्मक असेल तर आपण त्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरुन सुंदर मानवी जीवन त्यांना निर्माण करुन देवू शकतो असे सांगून त्यांनी जागतिक स्तरावर दिव्यांगासाठी काम करणाऱ्या हेलन केलर, आणि लुईस ब्रेल यांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेश लिपटे सर (राष्ट्रीय प्राथमिक शाळा राजुर) यांनी केले व प्रास्ताविक सौ.सरोज भंडारी मॅडम (रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय,चिखलगाव) यांनी केले. कार्यक्रमांमध्ये सपना वासेकर मॅडम (साधन शिक्षक ग.सा.के. प. स. वणी) यांनी दिव्यांगाच्या २१ प्रवर्गा विषयी माहिती दिली तसेच शासनाच्या विविध सोयी सुविधा बाबत मार्गदर्शन केले. तसेच श्री. नितेश बावणे (समावेशित शिक्षण तज्ञ ग.सा.के.पं.स.वणी) यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध विषयावर चर्चा करून तेथील उपस्थित पालक वर्ग व शिक्षकांचे मार्गदर्शन केले. तसेच श्री. मेघराज भंडारी सर (संस्थापक - रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय) यांनी त्यांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थी कशाप्रकारे शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यात यशस्वी झाले व रोजगार प्राप्त करू लागले याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे व उपस्थित सर्व दिव्यांग विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे आभार प्रदर्शन कु. ढाले मॅडम (जि. प. प्राथ. शाळा पोहणा) यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गट संसाधन केंद्र पंचायत समिती वणी येथील श्री. निकोले सर (गटसमन्वय ), श्री. प्रकाश नागतुरे सर (माजी ग.शि.अ. तथा केंद्रप्रमुख, प. स. वणी ), श्री देवराव चिडे सर (साधनव्यक्ती ग.सा.के प. स. वणी), साखरकर सर (शिक्षक), ढाले मॅडम (शिक्षक), आसुटकर सर (शिक्षक), रामटेके सर (शिक्षक) तसेच सर्व साधन व्यक्ती व साधन शिक्षक (गसाके प. स. वणी), रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय चिखलगाव येथील शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास दिव्यांग आजी माजी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.