सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वंदनीय विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत तिथी प्रमाणे यावर्षी आज दिनांक ६ एप्रिलला प्रभू श्री रामनवमी दिवसाचे शुभ मुहूर्तावर, महाराष्ट्राचे भजन सम्राट सुरेंद्र डोंगरे आणि तेजस्विनी खोडतकर यांच्या भजन संध्या भक्ती गीताचा संगीतमय सुरेल कार्यक्रम, कोलगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथील विदेही सदगुरु जगन्नाथ महाराज देवस्थानाचे भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.
प्रसिद्ध तबला वादक सुयोग देवाळकर, निखिल मडावी आणि बँजो वरती प्रज्योत म्हैसकर यासह सूरज गेडाम, नाना कुळसंगे आणि शशिकांत निमसरकर यांची सुमधुर सुरेल मैफल रंगणार आहे.
विदर्भाचे आराध्य दैवत विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज यांच्या पदपावन स्पर्शाने पुनीत झालेल्या कोलगाव या नगरीमध्ये, कोलगाव ग्रामवासी यांच्या अथक परिश्रम आणि सहकार्यातून विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज यांच्या भव्य दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व देवस्थानाचे निर्माण झाले आहे. याच पावन सोहळ्याचे दुसरे वर्ष आणि श्री संत जगन्नाथ महाराज यांचा तिथीनुसार साजरा होणारा जन्मदिवस याच शुभमुहूर्ताचे औचित्य साधत कोलगाव ग्रामवासी यांच्या वतीने भव्य भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.