सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. 13) शहरासह वस्त्या मध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात उल्लेखनीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा, भीमगीत गायन, मिरवणूक आदींचा समावेश “भिम टायगर सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारला शहरातील आंबेडकर चौकात उल्लेखनीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच सायंकाळी 6 वाजता निळ्या फेटेधारी तरुण- तरूणींसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकारासह भिम गितांचा कार्यक्रम व विविध उपक्रमांमुळे ‘भीममय’ वातावरण होणार आहे . तसेच 14 एप्रिल सोमवारला शहरातील बसस्थानक परिसरात धम्म भोजन वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकर चौकात भिम टायगर सेनेच्या वतीने शहरातील मिरवणुकीचे स्वागत करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आकर्षक सजावटडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रविवारी पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमाचे आयोजन भिम टायगर सेनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भिम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश रायपुरे , जिल्हा संघटक आनंदकुमार शेंडे, तालुका अध्यक्ष राज घायवानसह संपुर्ण भिम टायगर सेनेने केले आहे.