सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : सतत पडणाऱ्या पावसामुळे गेले काही दिवस मार्डी नांदेपेरा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साठून रस्त्याचे तीन तेरा वाजलेले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अडचण ठरत आहे.
या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. तसेच या मार्गा वर क्षमतेपेक्षा अवजड वाहने वाहतूक सुरु असते. मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत असल्याने या रस्त्यावरून गाडी चालवणे फार कठीण झाले आहे. याचा मोठ्या प्रमाणावर डेलीविजेशांना त्रास सहन करावा लागत आहे.
जनामाय कासामाय देवी, भांदेवाडा हे विदर्भातील धार्मिक स्थळ असून,दर दिवसाला दर्शनासाठी असंख्य भाविक येतात पण त्यांची यात्रा ही खराब रस्त्यामुळे संकटमय बनत आहे. तसेच स्थानिक नागरिक, गावकरी, शेतकरी, शाळकरी मुले, सर्वसामान्य नागरिक, व याच रस्त्याने कामासाठी प्रवास करणारे कर्मचारी यांना या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. व रस्त्यावर साठणाऱ्या पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होत आहे.
मार्डी नांदेपेरा वणी मार्ग केवळ रस्ता नाही तर तो वणी या मोठया बाजार पेठेत स्थानिकांना रोजगार व औद्योगिक विकासाचा मुख्य दुवा आहे. याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रभावीशाली पावले उचलावी अशा भावना स्थानिकांनी व्यक्त होत आहे.