युवासेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मालमत्ता व पाणी करावर लावण्यांत आलेल्या व्याजाची रक्कम माफ करा, अशा आशयचे निवेदन शुक्रवारी (10) रोजी युवा सेनेच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी वणी यांना देण्यात आले.

वणी शहरातील नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या मालमत्ता व पाणीकर धारकांकडून कर वसूल करण्यात येते.संभवत: मालमत्ता व पाणीकर धारकांनी काही अपरिहार्य कारणास्तव तसेच आर्थिक अडचणीमुळे कराची रक्कम वेळेत भरणा केली नाही. मात्र, आता अनेक कर धारक सध्यास्थितीत कराचा भरणा करण्यास तयार आहेत. परंतु भरमसाठ रक्कम व्याजाचे स्वरूपात आकारण्यात आल्यामुळे कराच्या रक्कमेत अतुलनीय वाढ दिसून येत आहे. 

नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्याकरिता भरमसाठ रक्कम व्याजाचे स्वरूपात आकारण्यात आल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच महागाईची डोकेदुखी आणि त्यात व्याजाची भरमसाठ रक्कम कराचे स्वरूपात आकारणे म्हणजे सामान्य नागरिकांवर सपशेल अन्याय ठरत आहे. यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी व्याज माफ करून मुद्द्दल रक्कम वसूल केली आहे.व्याज माफीचा ठराव करण्यात यावा.करिता कराचे स्वरूपात आकारण्यात येत असलेली व्याजाची रक्कम माफ करून वरील कर मुद्दल स्वरूपात आकारण्यात यावा, व्याजाची रक्कम आकारल्यास युवासेनेकडून तिव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देतांना माजी उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, माजी शहर प्रमुख राजू तूरणकर, विनोद दुमणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले व्रतस्थ नेतृत्व म्हणजे लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार!


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर येथे लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळा संपन्न झाला.

राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन व्रतस्थ जीवन जगलेले द्रष्टे नेते म्हणजे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली तसेच चंद्रपूर आणि विदर्भात शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी काम करत आपल्या जीवनामध्ये अनेक मानके तयार केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यासोबतची आपली नाळ अधोरेखित करत या जिल्ह्याच्या विकासातील सर्व अडचणी दूर करणार असे आश्वस्त केले. यासोबतच लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या कार्याचा गौरव करणारा ग्रंथ राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून निर्माण करणार असेही श्री. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे यांच्यासह माजी मंत्री शोभाताई फडणवीस व इतर मान्यवर उपस्थित होते.

ॲड. कुमार मोहरमपुरी यांची माकपाचा जिल्हा सचिवपदी फेरनिवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १० वे जिल्हा अधिवेशन येथील नगाजी महाराज सभागृहात दि. ९ जानेवारी २०२५ ला घेण्यात आले. या अधिवेशनात कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांची फेरनिवड एकमताने करण्यात आली.

अधिवेशनाची सुरुवात माकपाचा कष्टकऱ्यांच्या विळा हातोडा चिन्ह व संघर्षाचे प्रतीक असलेल्या लाल झेंड्याचे पक्षाचे जेष्ठ सदस्य कॉ. खुशालराव सोयाम यांचे हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर पक्षाचे महासचिव कॉ. सीताराम येचुरी, प. बंगाल चे माजी मुख्यमंत्री कॉ. बुद्धदेव भट्टाचार्य, यवतमाळ जिल्ह्याचे जेष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव आणि ज्ञात अज्ञात शहीद झालेले तसेच जिह्यातील आत्महत्या झालेले कष्टकरी व शेतकरी यांना श्रद्धांजली आणि दोन मिनिटे मौन राखून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. 
कॉ. डी. बी. नाईक, कॉ. अनिता खुनकर व कॉ. चंद्रशेखर सिडाम यांच्या अध्यक्षीय मंडळाखाली पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ किसन गुजर यांचे उद्घाटनपर भाषण झाले. त्यानंतर कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी तीन वर्षाचा पक्षाचा संघटनात्मक व राजकीय अहवाल मांडला. ह्या अहवालावर कॉ. देविदास मोहकर(महागाव), कॉ. ॲड. दिलीप परचाके(वणी), कॉ. रमेश मीरासे(यवतमाळ), कॉ. निरंजन गोंधलेकर(यवतमाळ), कॉ. उषा मुरके(यवतमाळ), कॉ. प्रीती करमरकर(वणी), कॉ. सरिता दानव(वणी) आदींनी यांनी आपली मते मांडून अहवालाला पाठिंबा व्यक्त केला. 

अधिवेशनाला आलेले राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. सुनील मालुसरे यांनी मार्गदर्शनपर वक्तव्य केले, त्यानंतर शेतकरी संपाचे नेते व रा. स. मं सदस्य कॉ. डॉ. अजित नवले यांचे भाषण झाले. कॉ. डॉ. अजित नवले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जनतेचे मूलभूत प्रश्न रोजगार तसेच जमीन, जंगलं, गायरान जमीन ह्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या प्रश्नावर कम्युनिस्ट पक्षाखेरिज कोणताही पक्ष संघर्ष करीत नाही. त्यामुळे समाज घटकातील कष्टकरी वर्गाचे प्रश्न आर एस एस ची राजकीय संघटन असलेल्या भाजपचा काळात अती तीव्र झाले असताना ह्या सर्वांच्या मूलभूत प्रश्नांना मुख्य धारेत आणून तो सोडविण्यासाठी कम्युनिस्ट कार्यकर्ते सक्रिय रूपाने संघर्ष करीत आहे आणि हा संघर्ष पुन्हा वाढविण्याची गरज आहे, असे आवाहन केले.
या अधिवेशनात ॲड. कुमार मोहरमपुरी, ॲड. दिलीप परचाके, ॲड. डी.बी.नाईक, देविदास मोहकर, चंद्रशेखर सिडाम, अनिता खुणकर, मनोज काळे, कवडू चांदेकर, खुशाल सोयाम, मनिष इसाळकर, उषा मूरके, सदाशिव आत्राम, गजानन ताकसांडे, दयाराम जाधव,रामभाऊ जिद्देवार, प्रीती करमरकर, १७ लोकांची जिल्हा कमिटी त्यात ३ निमंत्रक विठ्ठल धावस, बादल कोडापे, आशिष सिदुरकर यांची निवड करून कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांची एकमताने पुन्हा एकदा जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली. 

या अधिवेशनाला ९५ पुरुष व ५६ महिला प्रतिनिधी सहभागी झाले होते. अधिवेशन उत्साहात झाले व शेवटी मार्क्सवाद, लेनिनवाद, इंकलाब , लालबावटा जिंदाबाद चा घोषणा देऊन अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.

सोमनाळा येथे भाकप ची शाखा स्थापन

सह्याद्री‌‌ चौफेर | ऑनलाईन 

वणी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमीत्य शाखा बांधणी व सभासद नोंदणी अभियानांतर्गत वणी तालुक्यातील सोमनाळा या गावात शाखा स्थापन करण्यात आली. 

याप्रसंगी झालेल्या सभेत काॅ.अनिल हेपट,काॅ.अनिल घाटे,अथर्व निवडिंग, यांनी मार्गदर्शन‌ केले. याप्रसंगी पक्षाची शाखा स्थापन करुन शाखा कॉन्सिल निवडण्यात आली. त्यामध्ये शाखा सचिव बंडु झाडे,सहसचिव राहुल काळे,सदस्य विवेक झाडे,शंकर केराम,कपील झाडे,अभिषेक झाडे,अविनाश संकिलवार,राहुल कनाके, मनोज कालेकार यांचा समावेश आहे.

संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी देवेंद्र चव्हाण यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

उमरखेडउमरखेड तालुक्यातील संगणक परीचालकाच्या हक्कासाठी लढणाऱ्या संगणक परिचालक संघटनेच्या तालुक्याध्यक्षपदी देवेंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदी सुमेध नवसागरे आणी राहुल काळबांडे,तर सचिवपदी शिवशंकर सुरोशे,महिला आघाडीपदी क्रांती धोंगडे,कोषाध्यक्ष राजू वानखेडे,संघटक पदी शंकर चंद्रवंशी,प्रसिद्धी प्रमुखपदी अजबराव चारोळे ,आणी गणेश राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल इंडिया योजनेच्या अंमलबजावणी करणारे संगणक परिचालक हे ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी सेवा पुरविण्याचे महत्त्वाचे काम करत आहे.मात्र गेल्या तेरा वर्षा पासून हे परिचालक अत्यल्प मानधनावर काम करत असून त्यांचा विविध मागण्यांसाठी संघटनेचे वारंवार आंदोलन केले आहे. नागपूर ,मुंबई, जिल्हा आणी तालुकाकार्यालयामध्ये आंदोलने करूनही त्यांची कामगार म्हणून मान्यता,स्थिर नोकरी आणि योग्य वेतन सारख्या मागण्या अजूनही प्रलंबित आहे.
संघटनेच्या कार्यकारिणीत सल्लागारपदी अमोल देवराये व विठ्ठल मोरे,देविदास राठोड,निळकंठ वाघमारे सदस्य पदी शंकर शिंदे,शफिक पिंजारी,संदेश धुळे , सचिन सकर्गे,विराजी हनवते,अनंता चव्हाण अविनाश चव्हाण,चेतना श्रीवास्तव , शीतल चव्हाण,आशा काळे निखील वानखेडे,बजरंग बद्रवाल,गोपाल वानखेडे,बालाजी श्रीसागर,विजय कोल्हे,मीरा अंबेकर,सुरेश राठोड, निरंजन राठोड,गजानन पुरी,तेजस करेवाड,विनायक राप्रती, रामराव राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

तालुकाध्यक्ष देवेंद्र चव्हाण यांनी सर्व संगणक परीचालकाना एकजूट ठरवण्याचे आहवाहन केले असून,संघटनेच्या मागण्यासाठी तीव्र लढा उभारण्याच्या निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी तालुक्यातील सर्व संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघटनेने भविष्यात आपल्या मागण्या साठी अधिक ठोस आणि प्रभावी योजना आखण्याचे आश्वासन दिले आहे.