ॲड. कुमार मोहरमपुरी यांची माकपाचा जिल्हा सचिवपदी फेरनिवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १० वे जिल्हा अधिवेशन येथील नगाजी महाराज सभागृहात दि. ९ जानेवारी २०२५ ला घेण्यात आले. या अधिवेशनात कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांची फेरनिवड एकमताने करण्यात आली.

अधिवेशनाची सुरुवात माकपाचा कष्टकऱ्यांच्या विळा हातोडा चिन्ह व संघर्षाचे प्रतीक असलेल्या लाल झेंड्याचे पक्षाचे जेष्ठ सदस्य कॉ. खुशालराव सोयाम यांचे हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर पक्षाचे महासचिव कॉ. सीताराम येचुरी, प. बंगाल चे माजी मुख्यमंत्री कॉ. बुद्धदेव भट्टाचार्य, यवतमाळ जिल्ह्याचे जेष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव आणि ज्ञात अज्ञात शहीद झालेले तसेच जिह्यातील आत्महत्या झालेले कष्टकरी व शेतकरी यांना श्रद्धांजली आणि दोन मिनिटे मौन राखून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. 
कॉ. डी. बी. नाईक, कॉ. अनिता खुनकर व कॉ. चंद्रशेखर सिडाम यांच्या अध्यक्षीय मंडळाखाली पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ किसन गुजर यांचे उद्घाटनपर भाषण झाले. त्यानंतर कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी तीन वर्षाचा पक्षाचा संघटनात्मक व राजकीय अहवाल मांडला. ह्या अहवालावर कॉ. देविदास मोहकर(महागाव), कॉ. ॲड. दिलीप परचाके(वणी), कॉ. रमेश मीरासे(यवतमाळ), कॉ. निरंजन गोंधलेकर(यवतमाळ), कॉ. उषा मुरके(यवतमाळ), कॉ. प्रीती करमरकर(वणी), कॉ. सरिता दानव(वणी) आदींनी यांनी आपली मते मांडून अहवालाला पाठिंबा व्यक्त केला. 

अधिवेशनाला आलेले राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. सुनील मालुसरे यांनी मार्गदर्शनपर वक्तव्य केले, त्यानंतर शेतकरी संपाचे नेते व रा. स. मं सदस्य कॉ. डॉ. अजित नवले यांचे भाषण झाले. कॉ. डॉ. अजित नवले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जनतेचे मूलभूत प्रश्न रोजगार तसेच जमीन, जंगलं, गायरान जमीन ह्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या प्रश्नावर कम्युनिस्ट पक्षाखेरिज कोणताही पक्ष संघर्ष करीत नाही. त्यामुळे समाज घटकातील कष्टकरी वर्गाचे प्रश्न आर एस एस ची राजकीय संघटन असलेल्या भाजपचा काळात अती तीव्र झाले असताना ह्या सर्वांच्या मूलभूत प्रश्नांना मुख्य धारेत आणून तो सोडविण्यासाठी कम्युनिस्ट कार्यकर्ते सक्रिय रूपाने संघर्ष करीत आहे आणि हा संघर्ष पुन्हा वाढविण्याची गरज आहे, असे आवाहन केले.
या अधिवेशनात ॲड. कुमार मोहरमपुरी, ॲड. दिलीप परचाके, ॲड. डी.बी.नाईक, देविदास मोहकर, चंद्रशेखर सिडाम, अनिता खुणकर, मनोज काळे, कवडू चांदेकर, खुशाल सोयाम, मनिष इसाळकर, उषा मूरके, सदाशिव आत्राम, गजानन ताकसांडे, दयाराम जाधव,रामभाऊ जिद्देवार, प्रीती करमरकर, १७ लोकांची जिल्हा कमिटी त्यात ३ निमंत्रक विठ्ठल धावस, बादल कोडापे, आशिष सिदुरकर यांची निवड करून कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांची एकमताने पुन्हा एकदा जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली. 

या अधिवेशनाला ९५ पुरुष व ५६ महिला प्रतिनिधी सहभागी झाले होते. अधिवेशन उत्साहात झाले व शेवटी मार्क्सवाद, लेनिनवाद, इंकलाब , लालबावटा जिंदाबाद चा घोषणा देऊन अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.
ॲड. कुमार मोहरमपुरी यांची माकपाचा जिल्हा सचिवपदी फेरनिवड  ॲड. कुमार मोहरमपुरी यांची माकपाचा जिल्हा सचिवपदी फेरनिवड Reviewed by सह्याद्री चौफेर on January 10, 2025 Rating: 5
Powered by Blogger.