पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक व साहित्य वाटप करून साजरा!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजु उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन या निमित्त करण्यात आले होते. 
मनसे विभाग अध्यक्ष रोशन शिंदे यांच्या पुढाकारातून वनोजा (देवी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजु उंबरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या सामाजिक स्तुत्यउपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी प्रशांत बोढे, अतुल गोंडे, सुशांत वरपटकर, अजय जुनगरी, विशाल गाडगे, अजय लखमापूरे, प्रशांत भंडारी उपसरपंच वनोजा देवी आदी मान्यवर उपस्थित होते.

जेष्ठ पत्रकार मा.श्री.रमेशभाऊ तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


जेष्ठ पत्रकार मा. श्री. रमेशभाऊ तांबे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सामाजिकतेचं भान आणि कर्तव्यची जाण यांचा मेळ घालून आयुष्यभर सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी धडपडणारे नेतृत्व...

जेष्ठ पत्रकार मा. श्री. रमेशभाऊ तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक :- पत्रकार व मित्र परिवार 
(वणी विधानसभा,क्षेत्र) 

आमचे नेते सन्मा. राजुभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


माझे मार्गदर्शक, माझे मोठे बंधू सन्मा. राजुभाऊ उंबरकर (पक्षनेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तमोत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! 

भाऊसाहेब आपणास या जन्मदिनी अनंत शुभेच्छा💐💐

शुभेच्छुक :- श्री. संतोष रोगे 
जिल्हा उपाध्यक्ष : मनसे यवतमाळ 

आमचं काळीज सन्मा. राजुभाऊ उंबरकर (पक्षनेता) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..


आमचं काळीज बंधूराज आदरणीय श्री राजुभाऊ उंबरकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.! भाऊसाहेब तुम्हाला उत्तम आणि दैदिप्यमान दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा...

वणी मतदार संघात आपण अनेक सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना कायमच मदत करित असतात,पुढेही असेच कार्य घडो. त्यामुळे आपल्या "हक्काचा माणूस" म्हणून ज्यांच्याकडे पाहलं जातं असे,आमचे नेते, सर्वांना हवेसे वाटणारे भावी आमदार तथा पक्षनेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना,सन्माननीय राजुभाऊ उंबरकर यांना पुनःश्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..💐💐

शुभेच्छुक :- रुपेशभाऊ ढोके 
अध्यक्ष : मनसे तालुका मारेगाव 

आर्थिक कोंडीने शेतकरी पुत्राची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सततच्या नापिकीमुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला आहे. शेतातून निघालेला माल बाजारपेठेत विक्रीला नेल्यास भाव मिळत नाही. पेरणीच्या काळात बँकांकडून पीककर्जासाठी नकारघंटा वाजविली जात आहे. चोहोबाजूने आर्थिक कोंडी होत असल्याने जगावं की मरावं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होत आहे. एकीकडे पेरणीची लगबग सुरू असताना दुसरीकडे पेरणीच्या काळातही शेतकरी असो की शेतकरीपुत्र, मृत्यू चा फास आवळताहेत. 

पत्नी, मुलांना सोबत घेऊन शेतकरी राबराब राबतो. मात्र, त्याच्या हाती कर्जबाजारीपणाशिवाय काहीच येत नाही. मागील वर्षाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाची निसर्गाने माती केली. शेतातून निघालेला माल मिळेल त्या भावात शेतमाल विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

आतापर्यंत तालुक्यात निम्म्या क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. हातात पैसाच नसल्याने बियाणे, खते आणायचं कुठून अशी परिस्थिती आहे. अशीच काहीशी परिस्थिती केगांव येथील शेतकरी पुत्राची होऊन त्याने शुक्रवारच्या रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांचे वय थकल्याने हा तरुण आपल्या वडिलांच्या शेतात राबत होता. मात्र, सतत च्या नापिकी आणि कर्जबाजारीने पुरता हतबल झाला असता काय करावे, असं चित्र डोळ्यात खेळत,त्याने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवले. त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं व त्यानंतर पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हनुमान प्रभाकर मेश्राम (27) रा. केगांव असे त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचं नाव असून शनिवारी दिनांक 29 जून रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. 

त्याच्या पश्चात आई-वडील,एक भाऊ व एक विवाहित बहीण असा बराच मोठा परिवार आहे. घरातील हनुमान हा कर्ताधर्ता असून त्याच्या अकाली निघून जाण्याने मेश्राम परिवारावर मोठं दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तर गावात हळहळ व्यक्त होत आहे.