सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजु उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन या निमित्त करण्यात आले होते.
मनसे विभाग अध्यक्ष रोशन शिंदे यांच्या पुढाकारातून वनोजा (देवी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजु उंबरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या सामाजिक स्तुत्यउपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी प्रशांत बोढे, अतुल गोंडे, सुशांत वरपटकर, अजय जुनगरी, विशाल गाडगे, अजय लखमापूरे, प्रशांत भंडारी उपसरपंच वनोजा देवी आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक व साहित्य वाटप करून साजरा!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 01, 2024
Rating: