रेती साठी शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात वाळू चा गहन प्रश्न असताना कोणीच यावर आवाज उठवायला तयार होत नसल्याने अखेर शिवसेना (शिंदे गट) ने काल मंगळवारला यवतमाळ महामार्गांवर चक्का जाम आंदोलन केले. हे आंदोलन शिवसेना तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधाकर गोरे वणी तालुका प्रमुख किशोर नांदेकर, मारेगाव शहर प्रमुख विजय मेश्राम, तालुका संघटक प्रवीण बलकी, उपसरपंच प्रशांत भंडारी, सरपंच सुरेश लांडे यांच्या सह शेकडो शिवसैनिक व घरकुल धारक रस्त्यावर उतरले होते.
तालुक्यात घरकुल योजना सुरू आहे परंतु रेती मिळत नाही. बुकिंग बंद असल्याच्या नावाखाली रात्री कशी बुकिंग करतात, लाभार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागतात, लहान गाड्यावर कारवाया आणि मोठ्या वाहनांना छुट अशा अनेक प्रश्नांना घेऊन महसूल विभागाच्या विरोधात काल आंदोलन करण्यात आले. दरम्यान,सेतू केंद्राचा सवाल तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी उपस्थित करित तहसीलदार यांना आंदोलन स्थळी चांगलेच धारेवर घरले. तसेच आतापर्यंत दिलेल्या आमच्या तक्रारी निवेदनाचे काय झाले याबाबत खुलासा करा, अशी ताठर भूमिका घेत उपविभागीय अधिकाऱ्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली. त्यानंतर हे चक्का जाम आंदोलन निवळले.
परिणामी या तहसीलदार व महसूल अधिकारी यांच्या वर कारवाई करा, अशी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने शेवटी 'चक्का जाम आंदोलन' करण्यात आले.असे विशाल किन्हेकार यांनी माध्यमाना सांगितले. 


शरद पवारांना मोठा धक्का; पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला, निवडणूक आयोगाचा निर्णय

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा सांगितला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे.

भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध झुगारून महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ४१ आमदार अजित पवारांसोबत गेले तर उर्वरित आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले. आयोगासमोर तब्बल १० वेळा झालेल्या सुनावणीनंतर आज निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं सांगत पक्षाचं चिन्हही त्यांना दिलं आहे.

दरम्यान, काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी शरद पवार गटाला आता पक्षाचं नवीन नाव आणि नवीन चिन्हाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे.


तहसीलदार निलावाड यांनी पकडला अवैध वाहतूक करणारा ट्रक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गदाजी (बोरी) येथून रेतीचे उत्खनन करून अवैधरित्या वाहतूक करताना महसूल विभागाने नुकतेच एका ट्रक ला दंडात्मक कारवाई साठी ताब्यात घेतले असून ही कारवाई आताच (मंगळवारी) महादापेठ गावाजवळ तहसीलदारांसह महसूल पथकांनी केली.

तालुक्यात अवैध उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली आहे. तहसीलदार निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे पथक तथा नायब तहसीलदार गदाजी बोरी परिसरात गुप्त माहिती च्या आधाराखाली दबा धरून बसले होते. अशातच गदाजी बोरी येथून अवैध रेतीचे उत्खनन करून पोबारा करीत असताना तहसीलदार, नायब तहसीलदार व महसूल पथक यांनी ट्रक चा पाठलाग करून आज दि.6 फेब्रुवारी ला सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान महादापेठ येथे पकडून त्या ट्रक वर कारवाई करण्यात आली.

तालुक्यातील वर्धा नदी घाटावर गेल्या अनेक वर्षापासून रेती तस्करांच्या नजरा खीळल्या आहे. यात अनेकांनी चांगलीच माया गोळा केली. मात्र, मागील काही दिवसापासून महसूल विभाग अॅक्शन मोडवर आल्याने सतत कारवाईचा बडगा उगारत असताना मालामाल झालेले तस्कर तहसीलदार यांच्या कारवाई ने चांगलेच धस्तावलेले आहे.

आजच (मंगळवारी ) ला रेती संदर्भात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मात्र, तहसीलदार उत्तम निलावाड निर्भीडपणे तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी कटिबद्ध असताना आज महादापेठ येथे एक ट्रक क्र. (एम एच 36 1675) हे वाहन अवैधरीत्या वाळू उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे आढळले. दरम्यान,त्या ट्रक वर जप्ती ची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड, श्री.नायब तहसीलदार भगत, श्री रघुनाथ कांडाळकर मंडळ अधिकारी आणि श्री विजय कनाके वाहन चालक हे उपस्थित होते. 

समीर भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा!

निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं, आणि सुख शांतीने सजवावं, अडचणींचे डोंगर पार करून, यश शिखरावर तुम्ही पोहचावं.

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎂

शुभेच्छुक :- सय्यद समिर मित्र परिवार, मारेगाव 

या जन्मदिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा...


तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि
दीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना करतो
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

आपल्या कणखर आणि युवा नेतृत्त्वाबद्दल मानाचा मुजरा 
आम्ही आशा करतो की आपण नेहमीच
इतरांना मदत करण्यास तयार असाल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अतुल भाऊसाहेब !

शुभेच्छुक : अतुल पचारे मित्र परिवार, मारेगाव तालुका