रेती साठी शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात वाळू चा गहन प्रश्न असताना कोणीच यावर आवाज उठवायला तयार होत नसल्याने अखेर शिवसेना (शिंदे गट) ने काल मंगळवारला यवतमाळ महामार्गांवर चक्का जाम आंदोलन केले. हे आंदोलन शिवसेना तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधाकर गोरे वणी तालुका प्रमुख किशोर नांदेकर, मारेगाव शहर प्रमुख विजय मेश्राम, तालुका संघटक प्रवीण बलकी, उपसरपंच प्रशांत भंडारी, सरपंच सुरेश लांडे यांच्या सह शेकडो शिवसैनिक व घरकुल धारक रस्त्यावर उतरले होते.
तालुक्यात घरकुल योजना सुरू आहे परंतु रेती मिळत नाही. बुकिंग बंद असल्याच्या नावाखाली रात्री कशी बुकिंग करतात, लाभार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागतात, लहान गाड्यावर कारवाया आणि मोठ्या वाहनांना छुट अशा अनेक प्रश्नांना घेऊन महसूल विभागाच्या विरोधात काल आंदोलन करण्यात आले. दरम्यान,सेतू केंद्राचा सवाल तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी उपस्थित करित तहसीलदार यांना आंदोलन स्थळी चांगलेच धारेवर घरले. तसेच आतापर्यंत दिलेल्या आमच्या तक्रारी निवेदनाचे काय झाले याबाबत खुलासा करा, अशी ताठर भूमिका घेत उपविभागीय अधिकाऱ्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली. त्यानंतर हे चक्का जाम आंदोलन निवळले.
परिणामी या तहसीलदार व महसूल अधिकारी यांच्या वर कारवाई करा, अशी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने शेवटी 'चक्का जाम आंदोलन' करण्यात आले.असे विशाल किन्हेकार यांनी माध्यमाना सांगितले. 


रेती साठी शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन रेती साठी शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on February 07, 2024 Rating: 5
Powered by Blogger.