ग्राम पंचायतने शाश्वत विकासाची ध्येय साध्य केली तर सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत केला जाऊ शकतो-केंद्र

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था  

मारेगाव : जि.प.यवतमाळ, पं.स. तथा पंचायत राज प्रशिक्षण केंद्र पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने मारेगावात शाश्वत विकासाच्या सतरा ध्येय ९ संकल्पना थीम ची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित या प्रशिक्षणात गाव स्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक सहभागी झाले होते.

यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशासेविका,यांचा समावेश होता. गरिबीमुक्त, उपजीविका पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही, पंचायत जलसमृद्ध गाव, स्वच्छ गाव, हरित गाव, पायाभूत सुविधा युक्त गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुप्रशासन युक्त गाव, महिला स्नेही गाव.आमचा गाव आमचा विकास, या शाश्वत विकासाबाबत जि.पी.डी.पी.च्या माध्यमातून थीमचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींधर आभाळे, पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अश्विन आडे, यांच्या मार्गदर्शनाखाली तिन दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले. गटविकास अधिकारी पि एम मडावी, मुनेश्वर, माने, जाधव, महल्ले, विस्तार अधिकारी यांनी प्रशिक्षण स्थळी भेट दिली. यावेळी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र पुसदचे निर्देशक शरद वानखडे, राज्य प्रविण प्रशिक्षक सुभाष पवार, रिता ठवकर, अरुण कांबळे, मारोती पचभाई, मारोती वेलादे, यांनी मार्गदर्शन करण्यात आले.

ग्राम पंचायतने शाश्वत विकासाची ध्येय साध्य केली तर सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत केला जाऊ शकतो. त्या साठी केंद्र शासनाने नियोजनबध्द कार्यक्रम हाती घेतला आहे. गावातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती सह स्थानिक ग्रामपंचायतीवर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या अमंलबजावणीसाठी ९ थीम तयार करण्यात आल्या आहे.

शहरांतील सर्व पाट्या मराठीत कराव्या, अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडणार

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : राज्यातील प्रत्येक दुकानांवर मराठी पाट्या असल्याचं पाहिजे,यासाठी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचा मोठा संघर्ष सुरु होता. आणि आजही ते यासाठी आक्रमक आहेत. कोर्टाने मराठी पाट्या लावण्याची २५ पर्यंतची मुदत दिली होती. परंतु शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनामध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम १९४८ अन्वये बंधनकारक आहे. असं असताना देखील वणी शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनांवर कोणती ही कार्यवाही नगर परिषद कडून होताना दिसत नसल्याचाही आरोप मनसेकडून करण्यात आला. शहराध्यक्ष शिवराज पेचे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे यांना निवेदन देऊन शहरांतील मराठी व्यतिरिक्त इतर भाषांच्या पाट्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली.
मनसेने आधीपासूनच मराठी पाट्या लावण्याबद्दल राज्यात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामध्ये कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतर देखील काही दुकानांवर इंग्रजी पाट्या अजून ही दिसत असल्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या दोन दिवसात करण्याचा अल्टीमेटम देत, तर न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करुन शहरांतील सर्व पाट्या मराठीत कराव्या अन्यथा या मुद्द्याला घेऊन मनसेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
या वेळी मनसेचे गितेश वैद्य, लक्की सोमकुंवर, हिमांशू बोहरा, सचिन जाधव, वैभव पुरानकर, संस्कार तेलतुंबडे, कुणाल सोमशेट्टीवार यांच्या सह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरपूर पोलिसांनी उधळून लावला कोंबड बाजाराचा डाव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यात कोंबड बाजाराला मोठे उधाण आले आहे. एक नाही,दोनदा नव्हे तर, तिसऱ्यांदाही पोलिसांनी शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या शिंदोला शेत शिवारातील या कोंबड बाजाराचा डाव उधळून लावल्याची घटना आज दिनांक १ डिसेंबर ला घडली. यात लाखोंच्या वर मुद्देमाल जप्त करित सहा आरोपी वर कारवाई चा बडगा उगारला आहे.

तालुक्यातील शिंदोला शेतशिवारात काही लोक एकत्र जमाव करून कोंबड्याच्या झुंज लावून राजरोसपणे खेळत असल्याची गोपनीत माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच मोठया शिताफीने सापळा रचून पोलीस टीमच्या मदतीने शिंदोला ते कळमना जाणाऱ्या रोडच्या नजीक कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकली असता सदर धाडीमध्ये मध्ये तीन जिवंत कोंबडे, सहा मोटरसायकल व नगदी असा एकूण ३,४४,०३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी अंकुश कवडू गोहोकर, विलास महादेव मरसकोल्हे, सुरेश बाबाराव वाबेटकर, गुजरात भास्कर थेरे, विनोद हरिदास येडे, अजित रमेश दुबे, असे एकूण सहा जण मिळून आले. त्यांच्यावर पोलिसात ४७१/२३ कलम १२ (ब) म.जू.का.प्रमाणे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 
     
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संजय राठोड, पीएसआय रामेश्वर कांडूरे, सुनील दुबे, प्रशांत झोड, निलेश भुसे, गुणवंत पाटील, घोडाम यांनी केली.

उपवधु-उपवर परिचय मेळावा यवतमाळ येथे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुला-मुलींची लग्नं जमविणे हे अत्यंत कठीण बाब असल्याची जाणीव वधू-वरांच्या पालकांना येत असल्याची उदाहरणे नजरेत आली आहेत.

मात्र,हिच बाब लक्षात घेत समाजातील गरीब,श्रीमंत मुला-मुलींची लग्नं जुळावी याकरिता आदिवासी परधान समाज समिती, यवतमाळ व्दारा आयोजित राज्यस्तरीय 'आदिवासी परधान समाज' उपवधु-उपवर परिचय मेळाव्याचे येथील स्थानिक बाळकृष्ण मंगलम कार्यालय, आर्णी रोड यवतमाळ (म.रा.) रविवार दि.११-०२-२०२४ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

राज्यातील पालक मंडळी अथवा त्यांचे नातेवाईक आणि हितचिंतक वधू-वर यांनी ह्या 'आदिवासी परधान समाज' उपवधु-उपवर परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी परधान समाज समिती च्या वतीने करण्यात आले आहे.

आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव उत्सहात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : भारतीय संविधान दिन व वीर शामदादा कोलाम जयंती उत्सवाच्या निमित्ताने गारगोटी पोड (इंदिराग्राम) येथे आदिवासी कोलाम समाज सांस्कृतिक दंडार कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

शामदादा कोलाम संघटना मारेगावच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार होते. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रदेश उपाध्यक्ष किसान आघाडी भाजपा दिनकर पावडे, माजी पं.स.सभापती वणी संजय पिंपळशेंडे, शंकर लालसरे, ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, बाजार समिती संचालक अविनाश लांबट, सुयर्भान ढोबरे, जयवंत ठेपाले, प्रविण बोथले, सरपंच प्रविण नान्हे व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तथा गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

या आयोजित कार्यक्रमात आदिवासी कोलाम समाजातील पारंपरिक लोककला दंडारीचे सादरीकरण करण्यात आले असून महिलां सशक्तीकरण, तथा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्सहात पार पडला.