सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : खोटं बोल; पण रेटून बोल, ही तर भाजपाची सवय आहे असा आरोप करित कलावती बांदुरकर यांनी भाजपा वर जोरदार टिका केली आहे. आज प्रधानमंत्री यांना निवेदन देऊन देशाचे गृहमंत्री यांचे वर कार्यवाही करण्याची मागणी केली.
काल लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलतांना देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी वर टिका करतांना जळका येथील कलावतीच्या घरी भेट देऊन तिला वाऱ्यावर सोडले तर तिला घर, वीज, पाणी, शौचालय,अन्न धान्य आदी मदत मोदी सरकारने पोहचविली अशी टीका केली होती. ही गोष्ट जेव्हा कलावती यांना इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून पहावंयास मिळाली तेव्हा कलावती बांदुरकर ह्या फार दुखावल्या माझ्या नावाचा वापर करून ज्या पद्धतीने ते सांगत आहे, हे चुकीचं आहे. मला जे काही मिळालं ते राहुल गांधी मुळे, काँग्रेस च्या काळात मिळाले असे सांगत माध्यमांशी संवाद साधला. आज त्यांनी महिला काँग्रेस च्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन पाठवून केंद्रीय मंत्री अमित शहा हे खोटे बोलले असून संसदेत खोटी माहिती देणाऱ्या शहावर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आज मारेगाव तालुका महिला काँग्रेस पक्षाचे वतीने कलावती बांदुरकर यांनी तहसीलदार यांचे मार्फत प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले. निवेदन देतांना महिला कांग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा अरुणा खंडाळकर, माजी. पं स सभापती शकुंतला वैद्य, सुषमा काळे, प्रतिभा कळसकर, पूजा ठेंगळे, मालती बोढे, सुरेखा कोयचाडे, सुनीता कुळमेथे कमल नाखले, कविता मडावी, माया पेंदोर, मंजुषा पोल्हे, माजी गटनेते उदय रायपुरे, खालिद पटेल, अनिल देरकर, रविंद्र धानोरकर, शाहरुख शेख, आकाश भेले, हंसराज तेलंग, पलास बोढे, जगदीश खडसे, आदी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.