सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : वनोजा देवी गावालगत असलेल्या डीपी बॉक्स ला वरील झाकण नसल्याने नकळत विजेचा धक्का लागण्याची शक्यता येथील उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी यांनी व्यक्त करित संबंधित विभागाला डामदौल अवस्थेत असलेल्या डिपी ला सुरक्षेच्या दृष्टीने वरील झाकण किंवा नवीन डिपी बॉक्सची मागणी सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच बंडुभाऊ पुनवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता महा. राज्य विद्युत वितरण कंपनी मारेगाव यांना करण्यात आली.
1भंडारी यांनी याबाबत मागील महिन्यात 2 जुलै, 23 जुलै 2023 रोजी फोटो सह माहिती विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र,त्यावर अजून पर्यंत काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. तसेच 11 के व्ही चा नाल्याच्या काठावरील स्मशानभूमीतील उभा असलेला जिवंत विद्युत प्रवाह पोल पडणाच्या मार्गांवर असून सुद्धा काम झालेले नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने डिपी बॉक्स व विद्युतखांब आहे तात्काळ उभारून गावाकऱ्यांना दिलासा देण्यात यावे अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली. जर विद्युत प्रवाह असलेला पोल पडल्यास वाहत्या पाण्यात विदयुत प्रवाह येवून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने या मागणीची दखल घेऊन तात्काळ डिपी बॉक्स व पोलची जागा बदलून घेण्यात यावी.अशी सुद्धा मागणी केली.
यावेळी स्थानिक रहिवासी,सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच बंडुभाऊ पुनवटकर व वनोजा ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी हे उपस्थित होते.