अविवाहित तरुणास अटक, विवाहित महिलेचे केले त्याने शारीरिक शोषण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : साधा भोळा नवरा व पदरात एक ते दीड वर्षाची चिमुकली असतांनाही तिने पोटच्या गोळ्याकडे दुर्लक्ष करित एका अविवाहित तरुणासोबत आपलं नवं आयुष्य थाटण्याचा बेत, अखेर फसल्याने विवाहित महिलेने वणी पोलीस ठाणे गाठून त्याच्या विरोधात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली. 

मैत्री, दीर्घ सहवास,विविध प्रलोभनातून तीचे शारीरिक शोषण करण्यात आले. अशी प्रकारे विवाहित महिलेची फसवणूक झाल्याचे प्रकरण तक्रारीनंतर समोर आले आहे. शहरालगत असलेल्या गावातील एका अविवाहित तरुणाने विवाहितेला प्रेमाच्या फासात अडकून वारंवार शारीरिक शोषण केले. ती एका दिड वर्षाच्या लेकराची आई आहे. तरी देखील तिला आपल्या प्रेमाच्या ओढवून "चल शादी कर लेते हैं"... म्हणत तीन दिवस बेपत्ता राहिले. परंतु मन भरलं आणि आरोपीने शब्द फिरवीला, त्याच्या अशा नकाराने चक्रावलेल्या महिलेने त्याला विनंती केली, परंतु मार्ग न निघाल्याने अखेर पोलीस स्टेशन गाठत त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असून त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज सुनिल पावडे (27) रा. वाघदरा असे या शारीरिक शोषणाच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आपली फसवणूक, शारीरिक शोषण झाल्याचे महिलेने अविवाहित तरुणाविरुद्ध शारीरिक शोषणाची तक्रार दाखल नोंदविली. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी सुरज पावडे याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित मार्गदर्शनात सपोनि आशिष झिमटे करीत आहे.

लग्न झालं संसार थाटला पण नाद सुटला नाही. नवरा, मुलं व संसाराची जाणीव न ठेवता कुणाच्याही आकर्षणाला बळी पडून संसाराचं वाटोळं महिला व पुरुषांमुळे कित्येक संसार उध्वस्त झाले आहेत. व्यभिचारी प्रवृत्तीमुळे नैतिकता लोप पावत चालली आहे. बेधुंद मनाच्या लहरी प्रमाणे भावना उसळ्या मारू लागल्या आहेत. त्यावर या आभासी दुनियेत नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं झालं आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : महागांव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष तथा मा पंचायत समिती सदस्य शरद पवार यांच्या गटांचे संदीप भाऊ ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
तालुक्यातील हिवरा सर्कल मधले आशेचे किरण संदिप भाऊ ठाकरे पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त कासारबेहळ, वरोडी, सेवानगर, टेंभी, करंजखेड, येथुन शेकडो समर्थकांनी व त्यांच्या चाहत्यांनी महागांव येथे जावून त्यांना त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

युवा जिल्हा उपाध्यक्ष संदिप भाऊ ठाकरे पाटिल यांचा 06 जुलै 2023 रोजी देवकृपा कृषी केंद्र महागांव येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या अभिष्टचिंतन दिना निमित्ताने काँग्रेसचे शेलेश कोपरकर, शिवसेनेचे शाखा भरवाडे, संजय नागरगोजे, बाबा पाटील, निरंजन कवाने, अवधुत पंडागळे, दशरथ राठोड, मोहनराव करे, विष्णू जाधव, शेषराव करे, राजु पाटे, संतोष आडकिने, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला सहकार्य रामहरी पाटील आडकिने व त्यांच्या टिम चे लाभले व या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना जिल्हा परिषदेच्या भावी सदस्यपदी शुभेच्छा देण्यात आल्या. 


इतर मागास प्रवर्ग विद्यार्थी वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात – मंत्री अतुल सावे

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : इतर मागास प्रर्वगातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने वसतिगृह उपलब्ध करुन देण्यात असलेल्या अडचणी तातडीने दूर करून या कामाला अधिक गती द्यावी, असे निर्देश इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

सहकार व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री श्री. सावे यांनी हे निर्देश दिले. यावेळी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, संचालक, प्रादेशिक उपसंचालक व सर्व सहाय्यक आयुक्त संबंधित तसेच अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी ३६ वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्ध होत नसेल, तर संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी समनव्य साधून यावर तातडीने मार्ग काढावा. तसेच इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी ७२ वसतिगृहे सुरु करण्यासासाठी इमारती भाड्याने घेण्यात ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर कराव्यात.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधारणा योजना, आश्रमशाळांच्या संच मान्यता, बंद पडलेल्या आश्रमशाळांचा आढावा, धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देणे, धनगर समाजाच्या विकासासाठीच्या विशेष योजना, कन्यादान योजना, मॅट्रिकोत्तर व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या प्रलंबित प्रकरणांचा जिल्हानिहाय व वर्षनिहाय माहितीसह आढावा, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजना, याबाबत जिल्हानिहाय आढावाही मंत्री श्री. सावे यांनी या बैठकीत घेतला.

"लढा" ह्या संघटनेचे पुढाकार : मुख्यकार्यकारी यवतमाळ यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : यवतमाळ जिल्हयातील अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी पदाची भरती शासननिर्णयानुसारच पारदर्शकपणे राबविण्यात यावी.

सध्या यवतमाळ जिल्हयात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी पदाची भरती शासननिर्णयानुसारच पारदर्शकपणे राबविण्यात यावी या करीता लढ़ा या संघटनेनी पुढाकार घेऊन सोमवार दिनांक ०३/०७/२०२३ रोजी निवेदन दिले.

सदर पदासाठी जिल्हयातील ग्रामपंचायत स्तरावर जाहींरात प्रसिद्ध करून शासन निर्णयानुसारच दि. १९/०६/२०२३ ते ०३/०७/२०२३ या कालावधित सरळ नियुक्तीने पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत भरती प्रक्रिया राबवित असल्याने यात हस्तक्षेप करण्याची किंवा अनियमितता होण्याची दाट शक्तता नाकारता येत नाही व यामुळे गरजु उच्च शिक्षित व्यक्ती या सेवेत येण्यापासून वंचीत राहू शकतो म्हणून उपरोक्त पदासाठी अंतीम निवड करीत असतांना शासन निर्णयानुसार निकश,अटी, शर्ती व शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर गुणानुक्रमानुसारच उमेदवाराची निवड करण्यात यावी या करीता लढ़ा या संघटनेद्वारे निवेदन देण्यात आले.

होणाऱ्या पदभरती प्रक्रीयेत कुठल्याही प्रकारची अनियमितता व हस्तक्षेप आढळून आल्यास ते खपऊन घेनार नाही असे संघटनेचे प्रमुख प्रवीण खानझोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे, ॲड. रुपेश ठाकरे ,ललित लांजेवार व राहुल झट्टे यांनी मत व्यक्त केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी जाहीर


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा :  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विधानसभा समन्वयक वैभव डहाने (वरोरा - भद्रावती विधानसभा, विधानसभा संघटक- मंगेश भोयर (वरोरा भद्रावती विधानसभा), उपतालुकाप्रमुख - सुधाकर बुऱ्हाण (खांबाडा आबमक्ता जि.प. गट), विलास झिले (चिकणी टेंभुर्डा. जि.प.गट), अरुण महल्ले (चरुरखटी सालोरी जि.प. गट), गोपाल देवतळे (माढेळी नागरी जि.प. गट), अभिजित पावडे (शेगाव बोर्डा जि. प. गट), उपतालुका समनव्यक - बळीराम चवले (माढेळी नागरी जि.प. गट), सुरेश कामडी (चरुरखटी सालोरी जि. प. गट), शहरप्रमुख गजानन - ठाकरे (शेगाव शहर), खेमराज कुरेकार (वरोरा शहर), शहर समन्वयक - राजू बिरीया (वरोरा शहर), उपशहरप्रमुख - अभिजित अष्टकार (वरोरा शहर), नितीन जुमडे (वरोरा शहर), शशिकांत राम (वरोरा शहर), अनिल सिंग (वरोरा शहर), संजय नरोले (वरोरा शहर), उपतालुकाप्रमुख मंगेश ढेंगळे (भद्रावती तालुका), राहुल ठेंगणे (भद्रावती तालुका), बंडू नन्नावरे (चंदनखेडा मुधोली जि.प. गट), प्रदीप महाकुलवर (नंदोरी कोकेवाडा जि. प. गट), रविभाऊ भोंगे (माजरी पाटाळा जि.प.गट ), सुनील मोरे (घोडपेठ कोंढा जि.प. गट), उपतालुका समन्वयक बंडुभाऊ निखाते (चंदनखेडा मुधोली जि.प. गट), जनार्दन नन्नावरे (नंदोरी कोकेवाडा जि. प. गट), मनोहर आगलावे ( माजरी पाटाळा जि. प. गट), बंडुभाऊ बांदेकर (घोडपेठ मुधोली जि.प. गट), शहरप्रमुख रविभाऊ रॉय (माजरी शहर), शहर समन्वयक- भूमेश वालदे (भद्रावती शहर), शहर संघटक पंकज कातोरे (भद्रावती - शहर), उपशहरप्रमुख अरुण घुगुल (भद्रावती शहर), विश्वास कोंगरे (भद्रावती शहर), संतोष माडेकर (भद्रावती शहर), उत्तम मुजूमदार (भद्रावती शहर), अक्षय मालेकर (भद्रावती शहर), हनु पारोधे (भद्रावती शहर), मयूर शेडामे (भद्रावती शहर), सोनू बोनगिरी (भद्रावती शहर), विकास डुकरे (भद्रावती शहर), राहुल बावणे (भद्रावती शहर), शहर सहसंघटक साहेबराव घोरूडे (भद्रावती शहर) याप्रमाणे नियुक्त्या झालेल्या आहेत.

या नियुक्ती मधे जुण्या कट्टर शिवसैनिकांना तथा सक्रिय युवा नेतृत्वाला स्थान देण्यात आले आहे. खेमराज कुरेकर हे  १९९५ ते २०१५ पर्यंत शहर प्रमुख होते तर १५ वर्षे नगरसेवक राहिले. सुधाकर बुर्हान हे १९८८ पासून शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करीत आहे. वैभव डाहने हे पूर्वाश्रमीचे मनसे तालुका अध्यक्ष असताना भरीव असे काम केले. शासनाचा महसूल लुटणाऱ्या माफिया विरोधात टॉवर आंदोलन महाराष्ट्रभर गाजले. तर शिवसेना ज्येष्ठ नेते खैरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला होता. अभिजीत पालडे,विलास झिले यांचा प्रवास हा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षापासून तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकापर्यंतचा आहे व त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घेतला आहे. या सर्व पदाधिकारी व शिवसैनिक, युवा-युवती, महीला सघंटीका यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात नुकत्याच झालेले प्रत्येक निवडणुकीत एक हाती विजयी मिळविला आहे, हे विशेष.

या सर्व नवनियुक्त पदाधिकारीचे शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी अभिनंदन केले व ८०% समाजकारण तथा २०%  राजकारण या पद्धतीने काम करण्याचा सल्ला दिला आहे.

नियुक्ती झालेले सर्व पदाधिकारी हे मुळात जुने शिवसैनिकच असून त्यांच्या नियुक्ती मुळे विधानसभा क्षेत्रात नवचैतन्य व सामाजिक तसेच राजकीय कार्य जोमाने करण्याची ऊर्जा संचारली आहे.  या सगळ्यानी पक्षप्रमुखांनी दिलेल्या जवाबदारीची दखल घेवून मान. माजी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांचे आभार मानले आहे.

शिवसेनेचे भास्कर ताजने, दत्ता बोरेकर, नंदु पढाल, नर्मदाताई बोरेकर, घनशाम आस्वले आदींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.