"लढा" ह्या संघटनेचे पुढाकार : मुख्यकार्यकारी यवतमाळ यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : यवतमाळ जिल्हयातील अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी पदाची भरती शासननिर्णयानुसारच पारदर्शकपणे राबविण्यात यावी.

सध्या यवतमाळ जिल्हयात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी पदाची भरती शासननिर्णयानुसारच पारदर्शकपणे राबविण्यात यावी या करीता लढ़ा या संघटनेनी पुढाकार घेऊन सोमवार दिनांक ०३/०७/२०२३ रोजी निवेदन दिले.

सदर पदासाठी जिल्हयातील ग्रामपंचायत स्तरावर जाहींरात प्रसिद्ध करून शासन निर्णयानुसारच दि. १९/०६/२०२३ ते ०३/०७/२०२३ या कालावधित सरळ नियुक्तीने पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत भरती प्रक्रिया राबवित असल्याने यात हस्तक्षेप करण्याची किंवा अनियमितता होण्याची दाट शक्तता नाकारता येत नाही व यामुळे गरजु उच्च शिक्षित व्यक्ती या सेवेत येण्यापासून वंचीत राहू शकतो म्हणून उपरोक्त पदासाठी अंतीम निवड करीत असतांना शासन निर्णयानुसार निकश,अटी, शर्ती व शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर गुणानुक्रमानुसारच उमेदवाराची निवड करण्यात यावी या करीता लढ़ा या संघटनेद्वारे निवेदन देण्यात आले.

होणाऱ्या पदभरती प्रक्रीयेत कुठल्याही प्रकारची अनियमितता व हस्तक्षेप आढळून आल्यास ते खपऊन घेनार नाही असे संघटनेचे प्रमुख प्रवीण खानझोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे, ॲड. रुपेश ठाकरे ,ललित लांजेवार व राहुल झट्टे यांनी मत व्यक्त केले.
"लढा" ह्या संघटनेचे पुढाकार : मुख्यकार्यकारी यवतमाळ यांना निवेदन "लढा" ह्या संघटनेचे पुढाकार : मुख्यकार्यकारी यवतमाळ यांना निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 06, 2023 Rating: 5
Powered by Blogger.