वाहतूकीचे नियम पाळा व जीवन सांभाळा- ए.पी.आय. संजय आत्राम

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
 
वणी : आर. सी. सी. पी. यल. - मुकुटबन, ऍम पि बिरला ग्रुप, वाहतूक शाखा वणी आणि रा.से.यो.विभाग लोकमान्य टिळक महाविद्यालय,वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.८/२/२०२३ ला रस्ता 'सुरक्षा सप्ताह कार्यशाळा' चे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा समाजशास्त्र विभाग प्रमुख व रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.निलीमा दवणे तर प्रमुख पाहूणे लोजिस्टिक्स सेप्टी मॅनेजर श्री.राजकूमार हिरनखेडे, श्री.प्रकाश पंकज ( सिनियर एक्सक्यूटिव सेफ्टी) आर सी सी पी यल - मुकुटबन (ऍम पि बिरला ग्रुप), वाहतूक नियत्रंक ए.पी.आय.श्री.संजय आत्राम विचार मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यशाळा घेण्याचा उद्देश स्पष्ट करतांना श्री. राजकुमार हरिनखेडे माहीती देताना म्हणाले की, सरकारी आकडेनुसार, २०२१ मध्ये संपूर्ण भारतात एकूण ४,०३,११६ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे.
 २०२१ मध्ये ४,०३,११६ रस्ते अपघातांमुळे १,५५,६२२ मृत्यू आणि ३,७१,८८४ लोक जखमी झाले. ५५.९ टक्के रस्ते अपघात हे 'अतिवेगाने' ८७,०५० मृत्यू झाले आहे. आकडेवारीनुसार, रस्ते अपघातमधे ४४.५ टक्के बळी हे २ चाकी वाहतूक आणि १४.६% ट्रक किंवा लॉरी, १५.१ टक्के कार आणि ३.० टक्के बसेसचे होते.
रस्ते अपघाताची प्रमुख कारणे
• मद्यपानाच्या प्रभावाखाली वाहन चालवणे (drink and drive)
• अतिवेगाने वाहन चालवणे (overspeeding)
• धोकादायक आणि निष्काळजीपणे ड्रायव्हिंग आणि ओव्हरटेकिंग करणे. हे सगळ्या कारणामुळे रोड एक्सीडेंट से स्तर वाढले आहे, त्याला कमी करण्यासाठी लोकामधे "रोड सेफ्टी" बदल जागरूकता पसरली पाहिजे. हे सगळं करण्यासाठी कॉलेज रा.से.यो.विभागाने एक डिफेंसिव ड्राइविंग चा ट्रेनिंग कार्यशाळा आयोजीत केली. त्या मधे सगळ्या विद्यार्थिना रोड सेफ्टी बदल माहिती दिली गेली.

या कार्यशाळेत माहीती दिल्यानंतर प्रमुख पाहूणे राजकुमार हरिनखेडे यांनी वाहतूकीचे नियम पाळा आपले सुंदर जीवन सांभाळा, जीवन अधिक सुंदर जगण्याची जबाबदारी आपलीच आहे. असा सुंदर संदेश आपल्या मनोगतात व्यक्त केला. तर वाहतूक नियत्रंक (API) संजय आत्राम यांनी वाहतूकीचे नियम जर पाळले तर जीवन सुरक्षीत होवू शकते. आपला व दुसऱ्या चा जीव धोक्यात न घालणे हीच मानवता होय,असे प्रतिपादन केले.
विद्यार्थी हा समाजाचा आरसा असतो तसेच कुटूंबातला महत्वाचा दुवा. आपले जीवन अधिक सुरक्षीत करण्याकरीता वाहतूकीचे नियम पाळणे गरजेचे आहे.असे मत अध्यक्षीय भाषणातून डॉ.निलीमा दवणे यांनी व्यक्त केले.सुरक्षा सप्ताहाची माहीती दिल्यानंतर प्रश्नत्तेरी तासात विद्यार्थ्यानी अनेक प्रश्नाची उत्तरे दिली त्याबद्दल त्यांना बक्षीसे देण्यात आली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ.विकास जुनगरी यांनी केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

पत्रकार संदीप कोवे यांना पितृशोक

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे

मारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथील नारायण सीताराम कोवे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षाचे होते.

पत्रकार संदीप कोवे यांचे ते वडिल होते. आज बुधवारला पहाटे 5. वा. च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशी माहिती त्यांचे निकटवर्ती्यांनी दिली आहे.

श्री नारायण कोवे यांचे पश्चात पत्नी, दोन मुलं, सुन, नातू असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर आज 2 वाजता नवरगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहे. 


पदावली भजन स्पर्धेचे आयोजन...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील चिखलगाव येथे सार्वजनिक शिव मंदीर देवस्थान व श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पदावली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्री महोत्सव 2023 च्या पार्श्वभूमीवर सार्व. शिव मंदीर देवस्थान व श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.18,19 व 20 फेब्रुवारी 2023 रोजी चिखलगाव येथील शिवमंदीर देवस्थान च्या पटांगणात भव्य पदावली भजन स्पर्धा होणार आहे. लाखों बक्षीसांची भव्य लूट असून बाहेरगावावरून येणाऱ्या भजन मंडळाची भोजन व्यवस्था स्थानिक मंडळाद्वारे केली आहे. अधिक माहिती करिता आशुतोष काकडे, मनोज नवले, सचिन नागपुरे, सुनील मोहुर्ले, व आकाश ठेंगणे यांच्याशी संपर्क साधावा.

या स्पर्धेचा लाभ परिसरातील पदावली भजन मंडळानी घ्यावा असे आवाहन सार्व. शिव मंदीर देवस्थान, श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ तथा चिखलगाव ग्रामवासी यांचे वतीने करण्यात येत आहे.

आजचे राशीभविष्य : ७ फेब्रुवारी मंगळवार..!


            ⚛️ राशीभविष्य : ७ फेब्रुवारी मंगळवार..!

मेष :
मेष राशीसाठी कामाच्या ठिकाणी नवीन समीकरणांमुळे संपूर्ण वेळ व्यस्त असेल. काही रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागतील. सोने-चांदी व्यापाऱ्यांसाठी दिवस ठीकठाक राहील. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते आणि इच्छित ठिकाणी बदली देखील होऊ शकते. तुमच्यामध्ये भावनांचा अतिरेक असू शकतो. बाह्य उपक्रमांमध्ये जास्त वेळ घालवू नका. बाहेर जाताना काळजी घ्या. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.

वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी असेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. तुमच्याकडे नवीन उपक्रम असतील, ज्यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे समाधान होईल. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाचे बोलणे ऐकावे लागेल. आज तुम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितींशी लढण्यासाठी स्वतःला तयार ठेवाल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. आज ८५% नशिबाची साथ आहे. गाईला हिरवा चारा द्या.

मिथुन :
मिथुन राशीच्या लोकांना सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ मिळू शकतो. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. आज तुम्ही जीवनाशी संबंधित समस्यांवर सहज मात करू शकाल. नातेवाईकांशी असलेले पूर्वीचे मतभेद मिटतील. आज ८२% नशिबाची साथ आहे. माता लक्ष्मीची पूजा करा.

कर्क :
आज कर्क राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य परमोच्च स्थितीत असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्याही अंगावर येऊ शकतात. तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर नियम आणि कायद्यांचे पूर्ण पालन करा. कुटुंबातील सर्वांना सोबत घेऊन जाणे चांगले असेल. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. आज ७२% नशिबाची साथ आहे. गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या.

सिंह :
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्याचा नाही. भावंडांशी वादामुळे कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. प्रेमसंबंध तसेच राहतील. समर्पित भावनेने केलेल्या परिश्रमाने वरिष्ठांना संतुष्ट करू शकता. तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. कोणत्याही प्रकारची चर्चा करताना तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दाचे राहतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. आज ९२% नशिबाची साथ आहे. गणेशाला लाडू अर्पण करा.

कन्या :
कन्या राशीचे तुम्ही नवीन भागीदारी करू शकतात. तुम्‍ही व्‍यवसाय प्रकल्पांमध्‍ये उत्साही आणि विश्‍वासू आहात, म्‍हणून तुम्‍ही भविष्यात पूर्ण यश मिळवू शकाल. कोणतेही कायदेशीर प्रकरण प्रलंबित असल्यास न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही धर्मादाय कामांवरही पैसे खर्च कराल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज ८४% नशिबाची साथ आहे. शिव चालिसाचे पठण करा.

तूळ :
तूळ राशीच्या लोकांसाठी आज संमिश्र परिणाम संभवतात पण ते तुमच्या अनुकूल असतील. अनुत्पादक कामांमध्ये तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. तुमच्या निर्णयांकडे योग्य लक्ष द्या. कोणतीही गुंतवणूक करायची असल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरेल. मुलाची जबाबदारी पार पाडाल. बदलते ऋतू आणि नैसर्गिक आनंद लुटण्याची संधी मिळेल. आज ८५% नशिबाची साथ आहे. सरस्वती देवीची पूजा करा.

वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांना आज व्यापार क्षेत्रात खूप चांगले परिणाम मिळतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क लाभदायक ठरेल. व्यवसायिकांना भागीदारी किंवा सहवासातून चांगला नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थितीही सुधारेल. कुटुंबात आनंददायी परिस्थिती निर्माण होईल. नवविवाहितांना आज मंदिरात जाता येईल. आज ९५% नशिबाची साथ आहे. पांढऱ्या वस्तू दान करा.

धनु :
धनु राशीच्या लोकांसाठी, आजचा दिवस खूप वादग्रस्त ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या दुर्लक्षाला सामोरे जावे लागेल आणि तुमचे सहकारी तुमच्या कमकुवततेचे भांडवल करून तुमची इमेज खराब करण्याचे काम करतील. कोणत्याही कामात वडील किंवा संबंधित ज्येष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. कुटुंबात नवीन सदस्य सामील होऊ शकतो. आज ७२% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दूध अर्पण करा.

मकर :
मकर राशीसाठी, व्यवसायाच्या संदर्भात, व्यावसायिक संबंध आणि सौद्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. कामाशी संबंधित सहली आणि सहकार्य येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम देईल. तुमच्यापैकी काही प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात, प्रेम प्रकरणांच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल. अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी सुरू केलेले कोणतेही काम फायदेशीर ठरेल. तरुणांच्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा. आज ८५% नशिबाची साथ आहे. गणपतीला मोदक अर्पण करा.

कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांना जीवनसाथीदाराची साथ मिळेल. यामुळे तुम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकणार नाही. ही परिस्थिती तुम्हाला मानसिक गोंधळ आणि तणावात टाकेल. हे देखील लक्षात ठेवा की तुम्ही नाराज आहात हे कोणालाही कळू देऊ नका. तरुणांना संशोधन आणि सर्जनशील कार्यात यश मिळू शकते. आज गृहकार्याला अधिक प्राधान्य द्यावे लागेल. आज ९५% नशिबाची साथ आहे. मुंग्यांना पीठ खायला द्या.

मीन :
व्यवसायाच्या संदर्भात नवीन व्यावसायिक संबंध आणि सौद्यांना अंतिम रूप देण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. कामाशी संबंधित सहली आणि सहकार्य येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम देईल. तुमच्यापैकी काही महत्त्वाच्या लोकांशी संपर्क केल्याने अधिक प्रभावशाली होतील. आज तुमच्या मनात नवीन कल्पना येतील. उपजीविकेच्या साधनांमध्ये केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. आज ९२% नशिबाची साथ आहे. हनुमानाला शेंदूर अर्पण करा.


वणी पाठोपाठ मारेगावात प्रतिबंधक सुगंधित तंबाखू च्या गोडावून वर छापा...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची उलाढाल करीत मारेगावात प्रतिबंधक सुगंधित तंबाखू (जाफराणी मजा) चा गोरखधंदा चालविला जात असल्याविरोधात सापळा रचून काल रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता चे दरम्यान, एलसीबी व एफडीऐने घोंसा रोडवर असलेल्या गोडावून वर छापा टाकला.

यात 14 लाख 60 हजार किंमतीचे जाफराणी (मजा) व 3 लाख 60 हजार 463 रुपये किंमतीचे टाटा कंपनीचे चारचाकी वाहन असा एकूण 17 लाख 60 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. मारेगाव तालुक्यातील ही सर्वात मोठी आणि पहिलीच कारवाई असल्याची चर्चा असून, शेजारच्या वणी तालुक्यात मागील आठवड्यात साडेसात लाखाच्या वर कार्यवाही करण्यात आली होती, त्या पाठोपाठ मारेगाव शहरातही तशीच कारवाई चा बडगा संबंधित विभागाकडून उगारल्याने प्रतिबंधक सुगंधित तंबाखू चा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दनाणले आहे.

शहरात मागील अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा स्वीट मार्ट च्या आड सुरू होता, महाराष्ट्रात बॅन असलेला प्रतिबंधक सुगंधित तंबाखू परप्रांतातून आणून मारेगाव शहरासह ग्रामीण भागातही प्रतिबंधक जाफराणी (मजा) बिनधास्त विकल्या जाते. याची कुणकुण यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषधं प्रशासन विभाग यांना लागताच दि.5 फेब्रुवारी रोजी सापळा रचून मस्जिद शेख नामक व्यक्तीच्या प्रभाग क्रं. 17 मध्ये असलेल्या गोडावून वर धाड टाकली असता 17 लाखाच्या वर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

या कारवाईत संशयितास अटक करण्यात आली असून 14 लाख 60 हजार रुपयेची जाफराणी, 3 लाख 60 हजार 462 रुपये किंमतीचे टाटा एस. (मालवाहक वाहन) असा एकूण 17 लाख 60 हजार 462 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व संशायित आरोपी मस्जिद शेख यास अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 नुसार भांदवी 272, 273, 188, 328 व विक्री प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 26 (2), 27, 30 (2)(1), 59 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आज सोमवार ला मारेगाव न्यायालयात हजर केले असता, आरोपीस दि.8 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.