वणी पाठोपाठ मारेगावात प्रतिबंधक सुगंधित तंबाखू च्या गोडावून वर छापा...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची उलाढाल करीत मारेगावात प्रतिबंधक सुगंधित तंबाखू (जाफराणी मजा) चा गोरखधंदा चालविला जात असल्याविरोधात सापळा रचून काल रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता चे दरम्यान, एलसीबी व एफडीऐने घोंसा रोडवर असलेल्या गोडावून वर छापा टाकला.

यात 14 लाख 60 हजार किंमतीचे जाफराणी (मजा) व 3 लाख 60 हजार 463 रुपये किंमतीचे टाटा कंपनीचे चारचाकी वाहन असा एकूण 17 लाख 60 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. मारेगाव तालुक्यातील ही सर्वात मोठी आणि पहिलीच कारवाई असल्याची चर्चा असून, शेजारच्या वणी तालुक्यात मागील आठवड्यात साडेसात लाखाच्या वर कार्यवाही करण्यात आली होती, त्या पाठोपाठ मारेगाव शहरातही तशीच कारवाई चा बडगा संबंधित विभागाकडून उगारल्याने प्रतिबंधक सुगंधित तंबाखू चा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दनाणले आहे.

शहरात मागील अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा स्वीट मार्ट च्या आड सुरू होता, महाराष्ट्रात बॅन असलेला प्रतिबंधक सुगंधित तंबाखू परप्रांतातून आणून मारेगाव शहरासह ग्रामीण भागातही प्रतिबंधक जाफराणी (मजा) बिनधास्त विकल्या जाते. याची कुणकुण यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषधं प्रशासन विभाग यांना लागताच दि.5 फेब्रुवारी रोजी सापळा रचून मस्जिद शेख नामक व्यक्तीच्या प्रभाग क्रं. 17 मध्ये असलेल्या गोडावून वर धाड टाकली असता 17 लाखाच्या वर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

या कारवाईत संशयितास अटक करण्यात आली असून 14 लाख 60 हजार रुपयेची जाफराणी, 3 लाख 60 हजार 462 रुपये किंमतीचे टाटा एस. (मालवाहक वाहन) असा एकूण 17 लाख 60 हजार 462 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व संशायित आरोपी मस्जिद शेख यास अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 नुसार भांदवी 272, 273, 188, 328 व विक्री प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 26 (2), 27, 30 (2)(1), 59 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आज सोमवार ला मारेगाव न्यायालयात हजर केले असता, आरोपीस दि.8 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.