शालेय कर्मचारी पतसंस्थेत सहकार पॅनल ने मारली बाजी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. मारेगाव र. नं. 1061 च्या दि.5 फेब्रुवारी ला झालेल्या पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनल ने 15 पैकी 12 जागेवर विजय मिळवीत बाजी मारली. 
      
5 फेब्रुवारीला शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचे इतर मागासवर्गीय गटात गजानन देवाजी उपरे बिनविरोध निवडून आले. सर्वसाधारण गटात सहकार पॅनल चे संजय नानाजी पोटे, विजय तानबाजी नाखले, विनोद केशवराव देवाळकर, श्रीकांत गिरीधर गोहोकर, दिनेश अरुणराव गुंडावार, माधव झिंगराजी कोहळे, भूदेव माधवराव पांडे, अनिल दुर्गदत्त पेचे तर अनुसूचित जाती व अनु. जमाती मतदार संघात अरुण बळीराम भरणे, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाप्र मतदार संघात पंकज भारतराव राठोड, सपना बापूराव गेडाम विजयी झाल्या तर सर्वसाधारण गटात परिवर्तन पॅनल चे नितीन विजय कापसे, तर महिला राखीव गटात संगीता उमाकांत आवारी व सर्वसाधारण गटात अपक्ष विलास तात्याजी आसुटकर विजयी झाले.

या शालेय कर्मचारी पतसंस्थेवर सहकार पॅनलने 15 पैकी 12 जागेवर विजय प्राप्त करीत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.