टॉप बातम्या

इंडियन स्कॉलर्स अकॅडमी स्कुल चे वार्षिक स्नेह सम्मेलन संपन्न


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : इंडियन स्कॉलर्स अकॅडमी स्कूल मार्डी येथील तीन दिवसीय स्नेह-सम्मेलन मोठ्या थाटात संपन्न झाले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच रविराज चंदनखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या उदघाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन भास्करराव धानफुले, तर प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख अरविंद ताटेवार सर, पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील, माजी सरपंच तानबाजी नाखले, उपसरपंच सुधाकरजी डाहुले, ग्रा. पं. सदस्य सुरेश चांगले, सूरज पंडिले, गणेश कनाके, मंगला टिपले, शोभा कालर, छाया पुसाटे, मनिषा चौधरी इं. उपस्थित होते.
या निमित्ताने माजी विदयार्थी ईतिहास अभ्यासक समीर लेनगुले, संस्थेच्या अध्यक्षा मालाताई बदकी मॅडम, सचिव गौरव बदकी, मुख्याध्यापक केशव रिंगोले, शितल शेंडे, विनोद आंबेकर, प्रियंका डुकरे, प्रतिक्षा भगत, संदीप झोटींग, चंद्रकांत वांढरे, नेताजी बलकी उपस्थित होते.

या वार्षिक स्नेहसंमेलनात एकल नृत्य, समुह नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पालकांसाठी खेळ, आनंद मेळावा, खेळ यासारख्या विविध स्पर्धांचे व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,  समारोपीय दिवशी बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();