डॉ. करमसिंग राजपूत यांची ४७ व्या अर्थशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
       
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. करमसिंग राजपूत यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे संपन्न होणाऱ्या ४७ व्या विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
         
विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमध्ये १०० पेक्षा अधिक निबंध, अर्थशास्त्रावरील अभ्यासक्रमाशी संबंधित ११ पुस्तके, विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमधून १०० वर व्याख्याने, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळावर सलग दोन वेळा सदस्य, अमरावती आणि नागपूर विद्यापीठात आचार्य पदवी मार्गदर्शक अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे त्यांना हा गौरव प्राप्त झाला आहे.
      
अर्थशास्त्र विषयाची भारतातील सर्वात प्राचीन असणाऱ्या या परिषदेच्या आजवरच्या अधिवेशनांमध्ये विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांनी आजवर अध्यक्षपद भूषविले असून हा वैशिष्ट्यपूर्ण सन्मान त्यांना प्राप्त होत असल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सावधान...चिंचमंडळ येथिल युवकाची सोशल आयडी हॅक...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील युवकाची इन्स्टाग्राम या सोशल मिडिया आयडी हॅक करून त्यावरून अश्लील मॅसेज पोस्ट करत असल्याची तक्रार मारेगाव पोलीसात तक्रार प्राप्त झाली आहे.

तालुक्यातील चिंचमंडळ येथील तुषार प्रेमदास ताठे या युवकाची स्वतः वापरत असलेली सोशल मिडीया इन्स्टाग्राम आयडी अज्ञात व्यक्तीने आठ ते दहा दिवसापूर्वी हॅक करून अश्लील पोस्ट वायरल करत असल्याचे निदर्शनास आले. त्या अज्ञात व्यक्तीला चॅटिंग द्वारा विचारले असता त्या व्यक्तीने डुप्लिकेट इन्स्टाग्राम आयडी तयार करून तुषार ताठे या नावाने अश्लील पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली. या गंभीर प्रकाराबाबत योग्य चौकशी करून न्याय द्यावा, अशी तक्रार मारेगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. 

राशी भविष्य : आजचा जाणून घ्या आपला दिवस

  
               ⚛️ राशीभविष्य : ५ फेब्रुवारी रविवार..!

मेष
आज चंद्राचा बलवान योग पाचव्या राज्य घरामध्ये म्हणजेच त्रिकोण घरामध्ये तयार होत आहे. कौटुंबिक व्यवसायातील विशेष करार संध्याकाळपर्यंत निश्चित होईल. विशेष सन्मान मिळू शकतो. कौटुंबिक व्यवसायातील विशेष करार संध्याकाळपर्यंत निश्चित होईल. राज्याकडून विशेष सन्मान मिळू शकतो. शारीरिक विकासाचे योग चांगले आहेत. चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल, त्यामुळे तुम्हाला मंगलोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात शुभ खर्चाने तुमची कीर्ती वाढेल.

वृषभ
आज वृषभ राशीच्या लोकांचे लक्ष नवीन योजनांमध्ये घेतले जाईल. पवित्र स्थळाला भेट दिल्याने मनाला शांती मिळेल. व्यावसायिक कायदेशीर वादात यश, स्थलांतराची योजना यशस्वी होऊ शकते. दिवसाच्या उत्तरार्धात गोंधळ असला तरी पराक्रमात वृद्धी होईल. कुटुंबात आनंदी शुभ बदल होतील आणि इच्छा पूर्ण होतील. सुट्टीच्या दिवशी नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी कार्यालयात अनुकूल वातावरण असेल आणि तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप सर्जनशील आहे. काही सर्जनशील आणि कलात्मक काम पूर्ण करण्यात तुम्ही दिवस घालवू शकता. तुम्हाला जे काम सर्वात जास्त आवडते ते आज तुम्हाला तिथे करायला मिळेल. तुम्हाला आराम करण्यास मदत होईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन योजना मनात येतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करा.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप सर्जनशील आहे, ते कोणतेही काम समर्पित भावनेने करतात, त्याचे परिणाम त्यांना त्याच वेळी मिळू शकतात. व्यावसायिकांचे अपूर्ण काम मार्गी लागतील आणि फायद्यासाठी महत्त्वाची चर्चा होईल. तुम्ही कोणतेही काम समर्पित भावनेने करतात, त्याचे परिणाम त्याच वेळी मिळू शकतात. व्यावसायिकांचे अपूर्ण काम मार्गी लागतील आणि फायद्यासाठी महत्त्वाची चर्चा होईल. नोकरदार लोकांच्या विचारांनुसार ऑफिसमध्ये वातावरण तयार होईल आणि तुमचे सहकारीही तुम्हाला सहकार्य करतील. 

सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे, परंतु धर्म आणि अध्यात्माच्या बाबतीत थोडा वेळ काढणे चांगले. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. संध्याकाळचा काळ शुभ कार्यात जाईल. 

कन्या
कन्या राशीच्या लोकांनी आज परस्पर संभाषणात संयम व सावधगिरी बाळगावी. व्यवसायात आजूबाजूच्या लोकांशी संघर्ष होता कामा नये हे लक्षात ठेवा. वडिलधाऱ्यांशी कोणत्याही शुभ कार्यावर चर्चा होऊ शकते. नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने वागा. संध्याकाळी परिस्थिती आणखी सुधारेल.

तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कामाच्या व्यवहाराशी संबंधित सर्व वाद आज मिटू शकतात. नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काही काम सुरू होऊ शकते. रिअल इस्टेटच्या बाबतीत आजूबाजूचे लोक काही समस्या निर्माण करू शकतात. मित्रांसोबत गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते.

वृश्चिक
जर तुम्ही आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर आजचा दिवस खूप मजबूत आहे. दिवसभर लाभाच्या संधी मिळतील, त्यामुळे सक्रिय राहा. कुटुंबात शांतता आणि स्थिरता लाभेल. नोकरी किंवा व्यवसायात काही नावीन्य आणता आले तर भविष्यात त्याचा फायदा होईल. कामात नवीन जीवन येईल. नोकरदार लोक आज आराम करतील आणि त्यांच्या करिअरमधील प्रगतीसाठी वेळेचा सदुपयोग करतील.

धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आणि सतर्कतेचा आहे. व्यवसायात थोडीशी जोखीम पत्करली तर मोठा फायदा होण्याची आशा आहे. रोजच्या कामांच्या पलीकडे काही नवीन कामात हात आजमावून पहा. प्रिय व्यक्तीसाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल. नवीन संधी तुमच्या आजूबाजूला आहे, ती ओळखणे तुमच्या हातात आहे.

मकर
मकर राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात खूप फायदा होईल, परंतु मतभेद दूर ठेवा. नोकरदारांना दैनंदिन घरातील कामे हाताळण्याची आज सुवर्णसंधी आहे. जोडीदारासोबत मुलाच्या संबंधात मोठा निर्णय घ्यावा लागेल. व्यवसायातील प्रामाणिकपणा आणि विहित नियमांची काळजी घ्या. एकाच वेळी अनेक प्रकारची कामे हातात घेतल्याने चिंता वाढू शकते.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आरोग्याबाबत काळजी घेण्याचा आहे. हवामान बदलामुळे समशीतोष्ण विकार होऊ शकतात. केटरिंगमध्ये निष्काळजी राहू नका. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस आनंददायी जाईल. घाईत चूक होऊ शकते, म्हणून सर्वकाही काळजीपूर्वक करा. दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला नफा मिळत आहे.

मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. व्यवसायात जोखीम पत्करण्याचे परिणाम आज फायदेशीर ठरतील. संयमाने आणि तुमची मृदू वर्तणूक सुधारून समस्या दूर केल्या जाऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टींची कमतरता होती ते सर्व मिळवू शकता. एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत केल्यास ते शुभ होईल.


ओळख राजकीय नेतृत्वाची...



                  ओळख राजकीय नेतृत्वाची...

युवा नेतृत्व
      राहुल सुर

अवघ्या चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभेचे राजकारण एका नावाभोवती सारखं फिरतं. ते म्हणजे 'राहुल सुर' राजकीय पटलांवरती तुम्ही विरोधक असाल किंवा समर्थक, त्यांना टाळून सत्तेचा सारिपाठ मांडता येणार नाही. नव्या टोकदार राजकारणाचे ब्रँड बनलेले राहुल सुर मागील दहा वर्षांपासून लोकप्रियतेचा केंद्रस्थानी आहे.

गावपातळी ते केंद्रीय मंत्री ध्येय बाळगणाऱ्या या युवा नेतृत्वाचा मुळं गांव वेगांव (ता मारेगाव) असून त्याचे शिक्षण मराठी साहित्यात पदव्युत्तर झालं आहे. तरुणांनी राजकारणात यावं असे अनेक नेते आपल्या भाषणात आवाहन करतात. परंतु राहुल सुर या युवकांनी स्वतः पासून सुरुवात केली याचाच प्रभाव तरुण सुशिक्षित युवकांनी मागील नुकतेच झालेल्या ग्रामपंचायती व नगरपंचायत निवडणुकीत ५० टक्के उमेदवार तरुण लोकप्रतिनिधी झाले. २०१९ ला विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्धार त्यांनी केला होता परंतु एनवेळी २०१९ च्या निवडणुकीत उमेदवारी दाखल न केल्यामुळे युवा वर्गाचा व समर्थकांचा नाराजीचा सामना करावा लागला परंतु युवकांमध्ये नवंचैतन्य निर्माण करून पुनःश्च संघटन बांधणी त्यांची चालू आहे.

आजही लोकसभा क्षेत्रात नाव गावागावात पोहचले आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व युवा वर्गाचा बुलंद आवाज संसदेत सांसद रुपी लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात झळकणार असा त्यांचा निर्धार आहे. त्यांच्या या राजकीय प्रवासासाठी व पुढील सामाजिक व राजकिय वाटचालीस 'मित्र परिवारातर्फे शुभेच्छा...!!

संपादकीय | सह्याद्री चौफेर

चोपण येथील शेतकऱ्याने घेतला गळाफास


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील चोपण येथील एका शेतकऱ्याने गळाफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड ते दोन च्या दरम्यान, उघडकीस आली. सदर घटनेची वार्ता परिसरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.

गणपत अय्या आत्राम (अंदाजे वय 58) असे गळाफास घेवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज शनिवारी रोजी गणपत आत्राम हे काही कामा कामानिमित्त मार्डी येथे आले होते, काम आटोपून ते गावी परत गेले त्यानंतर ते बामर्डा शिवारात असलेल्या शेतात जावून त्यांनी शेतात गळाफास घेतला. घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन,पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले.

तूर्तास गणपत यांच्या आत्महत्येतेचे कारण अस्पष्ट असून त्यांचे पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, एक अविवाहित मुलगा असा आप्त परिवार आहे.
पुढील तपास पोलीस करित आहे.