सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यातील चोपण येथील एका शेतकऱ्याने गळाफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड ते दोन च्या दरम्यान, उघडकीस आली. सदर घटनेची वार्ता परिसरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.
गणपत अय्या आत्राम (अंदाजे वय 58) असे गळाफास घेवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज शनिवारी रोजी गणपत आत्राम हे काही कामा कामानिमित्त मार्डी येथे आले होते, काम आटोपून ते गावी परत गेले त्यानंतर ते बामर्डा शिवारात असलेल्या शेतात जावून त्यांनी शेतात गळाफास घेतला. घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन,पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले.
तूर्तास गणपत यांच्या आत्महत्येतेचे कारण अस्पष्ट असून त्यांचे पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, एक अविवाहित मुलगा असा आप्त परिवार आहे.
पुढील तपास पोलीस करित आहे.