अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

अमरावती :
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान दि. ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व मतमोजणी २ फेब्रुवारीला होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे आदी उपस्थित होते.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली असून, नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन प्राप्त नाही. नामनिर्देशन पत्रे दि. १२ जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी दि. १३ जानेवारीला होईल. उमेदवारी अर्ज दि. १६ जानेवारीपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक प्रक्रिया दि. ४ फेब्रुवारीला पूर्ण करण्यात येईल.

मतदार संख्या

अंतिम मतदार यादीनुसार, अमरावती विभागात १ लाख २० हजार ९४४ पुरूष, ६४ हजार ९०६ महिला व इतर ७५ अशा एकूण १ लाख ८५ हजार ९२५ मतदारांची नोंदणी आहे. त्यात अमरावती जिल्ह्यात ३३ हजार २३६ पुरूष, २३ हजार ३२९ महिला, इतर ६४ असे एकूण ५६ हजार ६२९ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात २७ हजार ९४३ पुरूष, १६ हजार ५५२ महिला व ११ इतर असे एकूण ४४ हजार ५०६, तसेच बुलडाणा जिल्ह्यात २६ हजार १६१ पुरूष, १० हजार ३३६ महिला (इतर शून्य) असे एकूण ३६ हजार ४९७ मतदार नोंदणी आहे.

वाशिम जिल्ह्यात ११ हजार ७८ पुरूष, ३ हजार ९६६ महिला (इतर शून्य) असे एकूण १५ हजार ४४ आणि यवतमाळ जिल्ह्यात २२ हजार ५२६ पुरूष, १० हजार ७२३ महिला (इतर शून्य) एकूण ३३ हजार २४९ मतदारांची नोंदणी आहे.

मतदान केंद्रे

विभागात संभाव्य २६२ मतदान केंद्रे असतील. त्यात अमरावती जिल्ह्यात ७५, अकोला जिल्ह्यात ६१, बुलडाणा जिल्ह्यात ५२, वाशिम जिल्ह्यात २६ व यवतमाळ जिल्ह्यात ४८ केंद्रे असतील.

निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून २८८, मतदान अधिकारी म्हणून १ हजार १५३ व सूक्ष्म निरीक्षक म्हणून २८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात येत आहे.

निवडणुकीदरम्यान मतदानाच्या प्रक्रियेबाबत भरीव जनजागृती करण्यात येईल जेणेकरून मतदान बाद होणार नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोविड-१९ बाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, मतमोजणी केंद्र निश्चिती आदी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, रवी महाले, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणुकविषयक विविध बाबींची माहिती दिली, तसेच त्यांचे शंकानिरसन केले. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

सहाय्यक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

चंद्रपूर : तक्रारदार वरोरा येथील रहिवासी असून हे दिनांक ३१/०५/२०२२ रोजी पंचायत समिती वरोरा अंर्तगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथून आरोग्य सहायक या पदावरून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले आहेत. तक्रारदार यांचे अर्जित रजेचे सममूल्य रक्कम ६,५६,६००/- रूपये चे बिल काढुन देण्याचे कामाकरीता आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपुर यांनी तक्रारदारास ४,०००/- रुपये ची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांना लाच म्हणून ४०००/- रु. देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्यांचेविरुद लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०४/०१/२०२३ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती बरोरा यांनी ४०००/-रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती २,५००/- रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून आज दिनांक ०५/०१/२०२३ रोजी पंचायत समिती वरोरा येथे पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांना २,५००/- रु. लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील तपास कार्य सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही श्री राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, श्री. मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक श्री. अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, तसेच कार्यालयीन स्टॉफ ना.पो.अ. संदेश वाघमारे, रोशन चांदेकर पो. अं राकेश जांभुळकर, मपोकों पुष्पा काचोळे व चालक पो अं. सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.
यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

या वर्षीच्या रमाई समता पुरस्कारांसाठी वर्षा लांजेवार यांची निवड


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : सवांद प्रतिष्टान चंद्रपूर यांचे वतिने दिला जाणारा रमाई समता पुरस्कार या वर्षी नागभीड तालुक्यातील चिंधिचक येथिल वर्षा तुळशिदास लांजेवार यांना दिला जाणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दरवर्षी समता प्रतिष्ठानच्या वतिने देण्यात येत असतो. महिला बचत गटांचे कार्य करत असताना सेंद्रिय शेती. गांडुळखत, महिला फार्मर प्रोडुसर कंपनी, व कूषिप्रदर्शनी मधे नैसर्गीक शेतमाल विक्रीतुन एक वेगळीछाप वर्षा लांजेवार यांनी निर्माण केली. जिल्ह्यातील महिलांना अनेक कार्यक्रमाचे माध्यमातुन सक्षमीकरण करण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात.येत्या ८ जानेवारील चंद्रपूर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. रमाई समता पुरस्कारांसाठी वर्षा लांजेवार यांची निवड झाल्याबद्दल नागभिड तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत तालुक्यातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

आमिष देत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न; संशयितास अटक

<>वणी पोलीसात तक्रार दाखल, संशयित ताब्यात <>
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : एका 40 वर्षीय विकृताने तालुका स्थळापासुन जवळच असलेल्या त्याच गावातील एका 8 वर्षीय निरागस बालिकेला 10 रुपयाचे आमिष देत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला असुन, बालिकेच्या वतीने या गंभीर घटनेची तक्रार वणी पोलीसात केली. पोलीसांनी लगेच संशयितास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना इंग्रजी नुतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली आहे. 
               
वणी तालुक्यातील एका गावातील 8 वर्षीय निरागस बालिका नूतन वर्षाच्या प्रथम दिनी दुपारी आपल्या घराजवळ खेळत होती. मात्र, त्याच गावातील विकृत मानसिकतेने बरबटलेल्या 40 वर्षीय विकृताची नजर त्या निरागस बालिकेवर असल्याने तो बालिकेजवळ जात तिला त्याने 10 रूपयांचे आमिष दाखवुन त्या बालिकेला घरी घेऊन गेला. तिच्यासोबत चक्क अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करू लागला व याबद्दल कुणालाही काही सांगू नको असे धमकावले. घाबरलेल्या अवस्थेत निरागस बालिका घरी येवुन वडिलांना या घटनेची माहिती दिली. पालकांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. वणी पोलिसांनी लगेच संशयितास ताब्यात घेवून, अटक केली.
   
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

मनिषा तिरणकर "रत्न श्री 2022 पुरस्काराने सन्मानित

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : सौ.मनिषाजी तिरणकर ह्या अ.भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षा असून त्या शोषित पिडित महिला व लोक अधिकाराची लढाई लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वात संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील बालक,मुलीं,महिला वरील वाढत्या अत्याचारा विरोधात गेल्या अनेक वर्षापासून अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषद कार्यरत आहे.अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषद माध्यमातून अनेक मुलीं व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत असल्याने आजवर मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मनिषा वसंतराव तिरणकर ह्या सामाजिक कार्य करत असून महिलांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबवितात,स्वतः रक्तदान करुन रक्तदान करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करणे,मतिमंद मुलांना मदत करणे,कोरोना विषाणुच्या प्रादृभावाने प्रभावित झालेल्या लोकांना जिवनावश्यक वस्तु पुरविणे तसेच अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदच्या माध्यमातून राज्यातील पिडीतावर होणारे अन्याय,अत्याचारांची अनेक यांनी मार्गी लावले असून या सेवाभावी कार्याची दखल घेऊन नॅशनल चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांना रत्न श्री 2022 हा अवॉर्ड देण्यात आला आहे.

यावेळी नॅशनल चाइल्ड अँड वूमन डेव्हलपमेंट कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डाॅ.बिरेन दवे,राष्ट्रीय उपाध्यक्ष रचना भिमराजक,माया ठाकुर,रोजी आर्येन आदिंच्या प्रमुख उपस्थितीत अवार्ड देण्यात आला.