टॉप बातम्या

आमिष देत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न; संशयितास अटक

<>वणी पोलीसात तक्रार दाखल, संशयित ताब्यात <>
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : एका 40 वर्षीय विकृताने तालुका स्थळापासुन जवळच असलेल्या त्याच गावातील एका 8 वर्षीय निरागस बालिकेला 10 रुपयाचे आमिष देत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला असुन, बालिकेच्या वतीने या गंभीर घटनेची तक्रार वणी पोलीसात केली. पोलीसांनी लगेच संशयितास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना इंग्रजी नुतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली आहे. 
               
वणी तालुक्यातील एका गावातील 8 वर्षीय निरागस बालिका नूतन वर्षाच्या प्रथम दिनी दुपारी आपल्या घराजवळ खेळत होती. मात्र, त्याच गावातील विकृत मानसिकतेने बरबटलेल्या 40 वर्षीय विकृताची नजर त्या निरागस बालिकेवर असल्याने तो बालिकेजवळ जात तिला त्याने 10 रूपयांचे आमिष दाखवुन त्या बालिकेला घरी घेऊन गेला. तिच्यासोबत चक्क अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करू लागला व याबद्दल कुणालाही काही सांगू नको असे धमकावले. घाबरलेल्या अवस्थेत निरागस बालिका घरी येवुन वडिलांना या घटनेची माहिती दिली. पालकांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. वणी पोलिसांनी लगेच संशयितास ताब्यात घेवून, अटक केली.
   
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();