नागभीड तालुक्यातील अनेक गावात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती दिप फेरी कार्यक्रम

                    
सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके
7066027404        

नागभिड : कैलास सत्यार्थी फाऊंडेशन नवी दिल्ली पुरस्कृत "बालविवाह प्रतिबंधक जनजागृती दिप जलाओ अभियान" नोबल पारितोषिक विजेते आदरणीय कैलास सत्यार्थी यांच्या प्रेरणेतून चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील २५ पेक्षा अधिक गावांमध्ये स्नेहल ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद चे प्रतिनिधी अरुण बारसागडे यांचे मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंधक दिप जलाओ रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गावातील सरपंच, पोलीस पाटील,आशा कार्यकर्ती, अंगणवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, बचतगटांचे पदाधिकारी, महीला सदश्य, तरूण मुले-मुली, अनेक शाळकरी मुले,व गावांतील प्रतिष्ठीत व्यक्तींना सामावून घेण्यात आले होते.

बालविवाह प्रतिबंधक दिपजलाओ रॅली चे प्रत्येक गावातील मुख्य रस्त्यां वरून आयोजन करण्यात आले होते,बालविवाह हा देशावरील कलंक असून तो नष्ट झालाच पाहीजे या आत्मविश्वासांने ग्रामस्थ या रॅलीत हातामध्ये जळती मेणबत्ती, बालविवाहाचे संदेश देणारे रंगीत पोस्टर्स, तसेच नोबल पारीतोषिक विजेते आदरणीय कैलासजी सत्यार्थी यांचा संदेश पत्रके आणि बॅनर्स घेवून सहभागी झाले होते, रॅलीत "आगे बढ़ेंगे और जितेंगे!" "बालविवाह है कुप्रथा है, बेटी के लिए एक विपदा है! " कच्ची उम्र में मत करो ब्याह, दोनो का जिवन होगा तबाह!", "गाव गाव पहूचना है, बालविवाह रुकाना है!" या सारख्या अनेक घोषणांनी आसमंत दणाणून गेले होते, तर गावातील चौका चौकात गावक-यांना बालविवाह करू नका, मुलींना शिकू द्या अशी प्रतिज्ञा देण्यात आली. 


इतकेच नव्हे तर आम्ही बालविवाह समारंभात सहभागी होणार नाहीत व बालविवाह थांबविण्यासाठी पुर्ण प्रयत्नशील होवू, बालविवाहाची माहीती मिळाल्यास गावातील पोलीस पाटील, पोलीस विभाग व बालसंक्षक्षण कक्षाला कळवू अशीही शपथ देण्यात आली. नागभिड तालुक्यातील बोंड,राजोली, येनोली, सोनूली, इत्यादी २५ गावात या रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

तो पुन्हा आला.! परत एकदा घेतला वाघाने एकाचा बळी...


सह्याद्री चौफेर | मनोज अगडे
9765874115

ब्रम्हपुरी : सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 5/11/2022 ला उघडकीस आली. जगन हिरामण पानसे वय 75 वर्षे रा. लाखापुर येथील रहिवाशी असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

सविस्तर वृत्तांत असे आहे की, जगन हा सरपण गोळा करायला जंगलात (ता.4 नोव्हें.) ला गेला होता. मात्र, दिवस निघून गेला जगन घरी परत आला नाही. जगनचा शोध लाखापुर गावशेजारील असलेल्या शेत व जंगल
परिसरात कुटुंबीयांनी व घर शेजाऱ्यांनी रात्रीचे 7:00 वाजेपर्यंत घेतला. मात्र, जगनचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. हिच शोधमोहीम दुसऱ्या दिवशी म्हणजे 5/11/2022 ला सकाळीं सुरुवात केली असता, जंगलात हिंस्त्र प्राणी यांनी भक्ष केला असावा अशा अवस्थेत जगनचा मृतदेह आढळून आला. लगेच ही माहिती वनविभाग यांना देण्यात आली. काही वेळातच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. व मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय मध्ये रवाना करण्यात आले. यात निष्पन्न झाले की, जगनचा मृत्यु हा वाघाने हल्ला करून झाला. तसेच मृतक जगनच्या कुटुंबीयांना 25 हजाराची आर्थिक मदत वनविभागाकडून देण्यात आली. 


मात्र, दोन तिन दिवसात दोन घटना वाघाच्या हल्यात ठार झाल्याच्या घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशहतीत आले असून जगनच्या निधनाने पानसे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. संभाव्य वाघाचे धोके लक्षात घेता संबधीत वनविभागाने नरभकक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी पानसे कुटुंबीयांसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

'वसंत'च्या रणधुमाळीत 'सहकार'ची 'छत्री' सावली देण्यासाठी सज्ज


सह्याद्री चौफेर | न्यूज
9011152179

वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील वसंत जिनिंग प्रेसिंग निवडणुकीची रणधुमाळी अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. यामध्ये 'सहकार पॅनल'ची विजयाकडे वाटचाल सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वसंत च्या रणधुमाळीत ग्रामीण मतदारांची पसंती मोठ्या प्रमाणात 'सहकार'च्या 'छत्री'ला दिसुन येत आहे. मागील रंगनाथ ला भरघोस मतांनी निवडून दिल्याने तेच येथेही होईल असे, ग्रामीण भागातून चर्चील्या जात आहे. सहकारला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. त्यामुळे विरोधकांत चांगलीच धास्ती भरल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. वसंत जिनिंगला विकासाच्या उंच शिखरावर बघता, ग्रामीण मतदारांचे झुकते माप किंबहुना 'सहकार' च्या 'छत्री' च्या बाजुनी वाढता कौल दिसुन येत आहे. त्यामुळे जय सहकार पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरु झाल्याचे ग्रामीण भागातील मतदारांनमधुन बोलले जात आहे. एकंदरीत मतदार मायबाप विकासाच्या बाजुने कौल देणार असल्याचे चिन्ह दिसून येतेय...

म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !


                     • वाढदिवस || अभिष्टचिंतन


आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, आपलं कार्य आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जाओ..
आणि सुख समृद्धीचा बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो...

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगतांना लाभली त्यातले एक भाऊसाहेब 
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त तुम्हास आपुलकीच्या शुभेच्छा !

खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे.
वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. ज्यांचा आज वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आहे ते तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी मारेगाव,संचालक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पिसगाव, माजी संचालक कृ.ऊ.बा.स.मारेगाव, माजी उपसरपंच ग्रा.पं. पिसगांव असे विविध पद भूषविणारे श्री मारोती भाऊसाहेब गौरकार यांच्या बद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ४ टर्म ग्रामपंचायत, ३ टर्म सोसायटी, २ टर्म बाजार समिती, २ टर्म काँग्रेस तालुका उपाध्यक्ष, १ टर्म काँग्रेस महासचिव आणि आता विद्यमान तालुका अध्यक्ष असा त्यांच्या प्रवास आहे.. काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून एकनिष्ठतेने कार्यरत आहे.
गुरुदेव प्रेमी असल्यामुळे कोणत्याही कामात स्वताला झोकून देणे हा त्यांचा प्रांजळ स्वभाव आहे. लोकसभेच्या असो वा विधानसभेची निवडणूक व इतरञ कोणत्याही निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ते जोरकसपणे प्रयत्न करतात. पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ते पायाला भिंगरी बांधल्या सारखे भ्रमंती करतात. भाऊसाहेब खेडोपाडी,वाडी वस्तीत,पाड्यावर काँग्रेसचा विचार पोहचवितात. काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे असे सर्वांचे लाडके निष्ठावान कार्यकर्ते तालुका अध्यक्ष मारोती गौरकार (काँग्रेस कमिटी मारेगाव) यांना "5 नोव्हेंबर" अभिष्टचिंतन वाढदिवस सोहळ्या निमित्ताने निरोगी दीर्घायुष्य लाभोत या कामनेसह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

~ सह्याद्री चौफेर
बातमी वा जाहिरातसाठी संपर्क : 9011152179

अपघातात दोन गंभीर, नेरी खांबाडा मार्गावरील पांढरवाणी फाट्याजवळची घटना

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

चिमूर : नेरी खांबाडा मार्गावरील पांढरवाणी फाट्याजवळ आज सायंकाळी 7.30 ते 8 वाजता च्या दरम्यान एका दुचाकीस्वराने पायी चालणाऱ्या इसमाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सहित इसम गंभीर जखमी झाले असून दोघेही नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत.

साविस्तर वृत्त असे की सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येथील कमलाकर सावसाकडे वय 35 वर्षे हे सायंकाळी 6 वाजता दुचाकीने चिमूर समोरील शेंडेगाव येथे कामानिमित्त जाण्यासाठी निघाले असता नेरीजवळील पांढरवाणी फाट्याजवळ अंदाजे आठ वाजता दरम्यान पायी चालणाऱ्या इसमाला मागून जोरदार धडक दिली, यात दुचाकी स्वार सहित इसम गंभीर जखमी झाले सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ दोन्ही जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले सदर जखमींची प्रकृती ही धोक्याच्या बाहेर असल्याचे वृत्त कळले असून वृत्त लिहिपर्यंत नेरी येथील पायी चालणाऱ्या जखमी इसमाचे नाव कळू शकले नाही.