विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
अनोखी इसमाचा आढळला मृतदेह
प्रशासनाला जागे करण्यासाठी पत्रकारांचे भजन आंदोलन; आंदोलनाचा सतरावा दिवस
बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : गेल्या 17 दिवसापासून शिवाजी चौक ते महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज पर्यंत 100 फुट रस्ता करावा या रस्त्याच्या कडेला असलेल्या शंभर फुटाच्या आतील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद व मराठी पत्रकार संघ शिवाजी चौक उदगीर येथे सुरू असलेल्या शंभर फुटाच्या रस्त्यासाठी पत्रकाराचे अनेक दिवसांपासून धरणे आंदोलन चालू आहे.
आज धरणे आंदोलनाचा सतरावा दिवस असून देखील कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने या धरणे आंदोलनाकडे लक्ष दिले नाही म्हणून आज आषाढी एकादशी निमित्त शिवाजी चौक भर पावसात येथे आंदोलनाच्या ठिकाणी टाळ, मृदंगाच्या जय घोषणा त धरणे प्रशासनाला जागे करण्याचे काम पत्रकारांनी केले.
धरणे आंदोलन प्रसंगी पत्रकार अंबादास आलमखाने, नागनाथ गुट्टे, दर्पण न्यूज चे संपादक सुनील हवा, सुधाकर नाईक,अरविंद पत्की, निवृत्ती जवळे, विधीज्ञ विष्णू लांडगे, श्रवणकुमार माने, संगम पटवारी, मुक्त पत्रकार बालाजी सुवर्णकार, पत्रकार प्रा. बिभीषण मद्देवाड, दत्ता गायकवाड उपस्थित होते.
बेंबळाने शेतकऱ्याच्या पिकांचे केले नुकसान
विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यात मागील तीन चार दिवसापासून संततधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे मार्डी परिसर पावसाने चांगलाच प्रभावित झाला असून शेत मालांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तालुक्यात बेंबळाचे संथगतीने सुरु असलेले कामे अद्यापही शेवटाला गेली नाही. तसेच या बेंबळाचे कामात दोष असल्याने या बेंबळाचे बंधारे ठिकठिकाणी फुटून शेकडो हेक्टर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हानी झाली आहे.
या धुवाधार पावसाने फिसकीच्या जंगलालगत असलेल्या बामर्डा येथील अनिल अशोक भोंगळे यांच्या शेतात बेंबळा चे कालवे खोदून ठेवली मात्र, काम पूर्णत्वास गेले नसल्याने त्यांना या झालेल्या पावसाने मोठा फटका बसला. हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या नुकसानीला बेंबळाचे कालवे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्यामुळे शेतातील बेंबळा कालव्याच्या मातीचे ढिगारे शेतात पसरले, त्यामुळे पिकांची हानी झाले आहेत.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी समस्या सोवण्यासाठी घेतला पुढाकार!
कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
किनवट : शहरातील गोकुंदा ग्रामपंचायत येथील वार्ड क्रमांक ४ व ५ मध्ये अजुनपर्यंत पुष्कळ ठिकाणी पक्की नाली व पक्के रस्ते झालेले नाहीत. त्यामुळे या मुख्य समस्या घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी ग्रामसेवकास तक्रार देण्यासाठी सदरील वार्ड मधील सर्व महिला व पुरुषांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गेले. पण गोकुंदा ग्रामपंचायत मध्ये तेथील ग्रामसेवक मावळे उपस्थित नसल्याने तेथील कारकुन पवन कोरडवाड जवळ सर्व नागरिकांनी मिळुन लेखी निवेदन देऊन ग्रामसेवकास भ्रमणध्वनीवर सर्व समस्या सांगितल्या.
माध्यमांशी बोलताना आशिष शेळके यांनी सांगितले की, वार्ड क्रमांक ४ व ५ मध्ये, १५ ते २० वर्षांपासून पुष्कळ ठिकाणी पक्की नाली व पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी हे रहिवाशांच्या घरासमोरुन, अंगणातुन तर काही जणांच्या घरात देखील जात आहे, आम्ही या समस्यांचा १५ ते २० वर्षांपासून सामना करत आहोत, वारंवार आमच्या वार्ड मधील सदस्यांना सांगत आलेलो आहोत, तक्रारी करत आलेलो आहोत पण आजपर्यंत कुणीही यांची दखल घेतली नाही. पण आता जर ही समस्या लवकरात लवकर सोडविली नाही तर आम्ही येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत बहिष्कार टाकु आणि जर कुणी मतदान मागण्यांसाठी आले तर त्यांना याच गटाराच्या पाण्याने व चिखलाने माखु अशी चेतावणी आशिष शेळके सोबतच सर्व महिलांनी व नागरीकांनी दिली.
निवेदन देताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांच्या सोबत सदरील वार्ड मधील महिला विमलबाई राठोड, शिवनंदा फड, सावित्रीबाई देवकते, सुलोचना हुरदुके, छाया राऊत, पंचशिला गायकवाड, सुलोचना वाघमारे, सिताबाई हटकर, जयश्री धुर्वे, सारीका उघडे, अनुराधा मिरासे, शेख रुक्साना, शेख रेहाना, सत्यभामा ढगे तर पुरुष धनंजय वाघमारे, पत्रकार दत्ता जायेभाये, रवी वाठोरे, शेख सुलेमान, प्रल्हाद वाठोरे, कपील शेळके, गंगाधर कदम आदी उपस्थित होते.
बकरी ईद’ निमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगाव च्या शुभेच्छा
सह्याद्री चौफेर | न्यूज
बकरी ईद हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा सण साजरा करताना उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा अतिशय व्यापक विचार केला आहे. हा विचार सार्वकालिक, प्रासंगिक आहे.
बकरी ईदनिमित्त तालुक्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लीम बंधू - भगिनींना हार्दिक शुभेच्छा, या निमित्ताने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगाव जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष-उपाध्यक्ष, सचिव-सह सचिव, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख, संघटक, व सल्लगार यांच्या वतीने देण्यात येत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)