मारेगाव : तालुक्यात मागील तीन चार दिवसापासून संततधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे मार्डी परिसर पावसाने चांगलाच प्रभावित झाला असून शेत मालांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तालुक्यात बेंबळाचे संथगतीने सुरु असलेले कामे अद्यापही शेवटाला गेली नाही. तसेच या बेंबळाचे कामात दोष असल्याने या बेंबळाचे बंधारे ठिकठिकाणी फुटून शेकडो हेक्टर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हानी झाली आहे.
या धुवाधार पावसाने फिसकीच्या जंगलालगत असलेल्या बामर्डा येथील अनिल अशोक भोंगळे यांच्या शेतात बेंबळा चे कालवे खोदून ठेवली मात्र, काम पूर्णत्वास गेले नसल्याने त्यांना या झालेल्या पावसाने मोठा फटका बसला. हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या नुकसानीला बेंबळाचे कालवे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्यामुळे शेतातील बेंबळा कालव्याच्या मातीचे ढिगारे शेतात पसरले, त्यामुळे पिकांची हानी झाले आहेत.