टॉप बातम्या

कोसारा येथे नंदीपोळा उत्साहात साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील कोसारा येथे मोठया शांततेत नंदीपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. येथील पोळ्यामध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून छोटेछोटे बालक आपापले नंदी घेऊन सहभागी झाले होते. 

यावेळी नंदीपोळ्यामध्ये मुलांना खाऊ, प्रत्येकांना गिफ्ट म्हणून टिफिन बॉक्स वाटप करण्यात आले. यामध्ये वैयक्तिक सुद्धा बक्षीसही देण्यात आले होते. पोळ्याच्या निमित्त गावकऱ्यांनी मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसेकर साहेब आणि कोसाऱा येथील युवक प्रफुल कोंडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  

पोळामध्ये गुढी लावून पारंपारिक पद्धतीने पोळा संपन्न झाला. तोरण तोडून सांगता झाली. नंदी पोळ्यासाठी आर्थिक सहकार्य आयोजक दिलीप येडमे व आर्थिक सहकार्य चमू छाया अंकुश खाडे (सरपंच), सचिन पचारे (उपसरपंच), पांडुरंग नान्नवरे (माजी सरपंच), प्रेमदास गाणार (पोलीस पाटील), प्रकाश पचारे, श्रवण कुत्तरमारे, सचिन चांभारे, प्रकाश राऊत,  दिलीप येडमे, नामदेव कन्नाके, संघपाल गाणार, धनराज, खडसे निलेश एकोणकार, शंकर पचारे, गिरीश चौधरी, सतीश गावंडे, मोहन लांडगे, सागर खडसे, गणेश चल्पेलवार, विकास पचारे, राज झोटींग, सुरज येडमे, अमोल श्रीरामे, प्रवीण कुत्ततमारे सेच कोसारा येथील युवक युवती व महीला पुरूष आणि गावकरी यांच्या उपस्थिती हा नंदी पोळा संपन्न झाला.
Previous Post Next Post