टॉप बातम्या

मनसेच्या "ढोरकी" आंदोलनानंतर न.प.ची मोकाट जनावरांचा बंदोबस्त मोहीम सुरू...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीशहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर पालिकेने आता ठोस पाऊले उचलली असून यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच "ढोरकी" आंदोलन केले होते. दरम्यान २० ते २५ जनावरे नगर पालिकेत सोडले होते. शुक्रवार, शनिवार व रविवारी मध्यरात्रीही सदर मोहीम राबविण्यात आली असून जोपर्यंत शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहील असे सांगण्यात येत आहे.

नगर परिषदेचे नागरीकांना आवाहन :
नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले की, शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असतात तसेच चौकाचौकात भर रस्त्यावर ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या कोणाचे जनावरे असतील त्यांनी आपआपल्या जनावरांचा सांभाळ करावा, शहरात मोकाट सोडू नये, अन्यथा मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकण्यात येईल आणि त्यानंतर त्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी गौरक्षण संस्थेला देण्यात येणार आहे, असे आवाहन नगर परिषद तर्फे करण्यात आले.
Previous Post Next Post