विचोडा ग्रामपंचायत अंतर्गत मौजा चांदसूर्ला येथील सरपंच, उपसरपंच पदाधिकाऱ्यांनी गावातील समस्याची पाहणी केली पाहणी व अधिकाऱ्यांच्या घेतल्या भेटीगाठी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

चंद्रपूर : पदमापुर वेस्टर्न कोलच्या मातीच्या डम्पिंग मुळे पावसाळा आला की या डम्पिंग वरून पावसाचे पाणी सरळ चांदसूर्ला गावातील शेती शिवारातून गावाकडे येत असून या पाण्यामुळे दरवर्षी शेतमालाचे तसेच चांदसूर्ला गावातील काही भागातील घरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतात.
ही समस्या लवकरात लवकर सुटावी याकरिता पदमापुर वेस्टन कोल लिमिटेड चे जनरल मॅनेजर यांना श्री.अनिल डोंगरे यांचेकडून फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी दिनांक 9/7 2022 ला प्रत्यक्ष ठिकाणी येऊन या समस्यांची पाहणी करणार व समस्या सोडवण्याकरिता प्रयत्न करनार अशे ते यावेळी बोलले. तसेच चांदसुर्ला गावातील जंगली जनावर वाघ बिबट्या अस्वल या हिंसक प्राण्यांच्या वास्तव्यामुळे शेतकरी तसेच गावातील नागरीकामधील भीतीचे वातावरण पसरले (अनिल डोंगरे व उपसरपंच प्रतिनिधी अधिकारी यांचेशी चर्चा करताना)
असून या प्राण्याचा बंदोबस्त करावा तसेच नदी नाल्यातील झुडपी जंगले साफ करण्यात यावे याकरिता ग्रामपंचायत प्रतिनिधीकडून आर एफ ओ कारेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले व ही समस्या लवकरात लवकर निकाली लावण्यात यावे याकरिता जातीने लक्ष द्यावे असे भेटीदरम्यान कळविण्यात आले. गावातील विद्युत लाईनच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त असल्यामुळे त्या विभागाचे पेन्दोर साहेब यांना भेटून विद्युत लाईनच्या समस्याचे माहिती देऊन ही समस्या तात्काळ निकाली लावण्यात यावे असे भेटी दरम्यान त्यांना सांगण्यात आले.
 यावेळी विचोडा ग्रामपंचायत सरपंच सौ माधुरी सागोरे,
 उपसरपंच श्री अनिल डोंगरे ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीता हेलवडे व गावातील नागरिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

साई मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : सतत 10 वर्षांपासून रक्तदान शिबीर घेवून अनेक गरीब गरजवंत लोकांना जीवनदान देवून गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी (2022) सुद्धा भव्य रक्तदान शिबीर मंगळवार दि.12 जुलै ला सकाळी 11 वाजता महामार्गवरील जगन्नाथ महाराज मंदिर, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे होणार आहे.
या शिबिरात वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांच्या उपस्थितीत पार पडणार असून बुधवार दि. 13 जुलै ला सायंकाळी 5 वाजता महा प्रसाद व भव्य शोभा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या भव्य रक्तदान शिबिरास, महाप्रसाद व शोभा रात्रेत तालुक्यातील जनतेनी  मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान, महाप्रसाद व शोभा यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन साई मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.

            जाहिरात साठी संपर्क : 9011152179

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या 29 जुलै 2022 रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.

मुसळधार पावसाचा तडाखा; एक पाण्याबेलातील संरक्षण भिंत कोसळण्याच्या मार्गांवर

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मौजा वनोजा देवी परिसरातील एक पाण्याबेल भाविका साठी प्रसिद्ध आहे. या एक पाण्याबेलात जगन्नाथ महाराज यांचे मंदिर आहे. येथे दुरूनदुरून श्रद्धालू येतात. या पाण्याबेलात दर महिन्याच्या सोळा तारखेला काल्या किर्तनाचा कार्यक्रमही असतो. भक्त याठिकाणी मोठा संख्येने महाराजांच्या दर्शनासाठी महाप्रदासाठी येतात आपली मनोकामना पूर्ण करून जातात.
मागील बारा तासापासून तालुक्यात धुआधार पाऊस झाल्याने या एक पाण्याबेलातील असलेल्या जगन्नाथ महाराज मंदिर परिसरातून वाहता नाला आहे. तसेच दोन नाल्यांचा संगमही आहे. त्यामुळे या मंदिर परिसरत पाणी शिरू नये, पाण्यापासून संरक्षण म्हणून या मंदिरा जवळच वाघाळा नाल्याच्या काठाणे संरक्षण भिंत बांधण्यात आली. मात्र, मुसळधार झालेल्या पावसामुळे संरक्षण भिंत पडण्याच्या मार्गांवर आहे. किंबहुना पडूनही जाईल, या महिन्याची सोळा तारीख जवळच येत आहे.
असे भक्त सांगून जातात. 

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत.

यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गिकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्त्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भूमिका आहे.