साई मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : सतत 10 वर्षांपासून रक्तदान शिबीर घेवून अनेक गरीब गरजवंत लोकांना जीवनदान देवून गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी (2022) सुद्धा भव्य रक्तदान शिबीर मंगळवार दि.12 जुलै ला सकाळी 11 वाजता महामार्गवरील जगन्नाथ महाराज मंदिर, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे होणार आहे.
या शिबिरात वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांच्या उपस्थितीत पार पडणार असून बुधवार दि. 13 जुलै ला सायंकाळी 5 वाजता महा प्रसाद व भव्य शोभा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या भव्य रक्तदान शिबिरास, महाप्रसाद व शोभा रात्रेत तालुक्यातील जनतेनी  मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान, महाप्रसाद व शोभा यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन साई मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.

            जाहिरात साठी संपर्क : 9011152179
साई मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन साई मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.