सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (०2सप्टें.) : झेंडावंदन कॉम्रेड पांडुरंग टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले,लाल झेंड्याला सलामी देण्यात आली व कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कोरोना काळामध्ये मृत पावलेल्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
गेल्या सात वर्षापासून सत्तेत असलेले मोदी आणि भाजप चे सरकार सतत शेतकरी,कामगार आणि कष्टकरी वर्गाचे विरोधात धोरण घेऊन भांडवलदारांच्या हिताचे धोरण घेत आहे. शेतकरी विरोधी कृषी कायदा आणला, कामगारांनी लढून मिळविले कायदे संपविले,सार्वजनिक ऊधोगा चे खाजगीकरण केले,आणि सार्वजनिक क्षेत्र व देश विक्रीस काढला मोदी सरकार देश विरोधी आहे. या सरकारचे जन विरोधी धोरण हाणून पाडण्यासाठी कष्टकरी वर्गाची एकजूट आणि संघर्ष हाच एकमेव पर्याय आले. असे प्रतिपादन मा. क. प. च्या केळापूर तालुका अधिवेशनाच्या प्रसंगी समारोपीय भाषणात मा. क. प चे राज्य कार्यकरणी सदस्य कॉ. शंकरराव दानव यांनी केले.
पुढे कॉ. दानव असेही म्हणाले की, कष्टकरी वर्गाच्या हिताची लढाई केवळ लाल बवटा लढतो आहे. हा लाल बावटा सतत रस्त्यांवर जन माणसाच्या प्रश्नांना घेऊन रस्त्यांवर दिसतोय. या लढाई चा मी आणि तुम्ही सर्वच सैनिक आहोत. या परिसरात मा. क. प ची जनचळवळ अधिक मजबूत करा,आणि आपले हक्क प्राप्त करण्यसाठी रस्त्यांवर या! मोदी सरकार ला निर्वाणीचा ईशारा देण्याकरिता २५ सप्टेंबर च्या भारत बंद आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा! केळापूर् तालुका अधिवेशनात जिल्हा सचिव कॉ. ऍड. दिलीप परचाके भाषणात म्हणाले की, विळा हातोडा कष्टकरी वर्गाच्या लढाई चे प्रतीक आहे. हा लाल बावटाच शोषण मुक्ती च्या मार्गाचा मार्गदर्शक आहे. सतत खांद्यावर लाल बावटा असूद्या! व कॉ.चंदरशेखर सिडाम यांनी प्रास्ताविक मांडले. कॉ. भाऊराव टेकाम, कॉ. पांडुरंग टेकाम, कॉ. सुरेखाताई बिरकुलवार यांनी आपले मत मांडले.
दर तीन वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनात तीन वर्षांच्या लेखाजोखा होऊन पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. तेरा सदस्यीय तालुका कार्यकारिणीत कॉ चंद्रशेखर सिडाम यांची तालुका सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. कॉ अय्या आत्राम, कॉ. संदीप सुरपाम, कॉ सोनू आत्राम, कॉ. सुरेखा बिरकुलवार, कॉ. भाऊराव टेकाम, कॉ. पांडुरंग टेकाम, कॉ. प्रशांत लसंते, कॉ. संतोष टेकाम, कॉ. गणेश आत्राम, कॉ. भारत टेकाम, कॉ. बडीराम मेश्राम, कॉ. रामराव टेकाम अशी कमेटी निवळ करण्यात आली. या वेळी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते महिला व पुरुष उपस्थित होते.