सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०१ संप्टें.) : शांतीदुत परिवर्तन बौद्ध मंडळच्या माध्यमांतून परिवर्तन चौक, राजीव गांधी नगर, चंद्रपूर येथे मागील १५ वर्षापासून सदर खुल्या जागा जंगल स्वरुपात असतांना समाजाने साफ सफाई करून त्या ठिकाणी धम्मध्वज उभारण्यात आला व त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच इतर समाज प्रबोधन कार्यक्रम घेऊन समाज जागृतीचे काम गेल्या १५ वर्षापासून येथील बौद्व बांधव करीत आहेत.
दरवर्षी बौद्ध समाज बांधवाकडून त्या ठिकाणी थोड्या-थोड्या प्रमाणात त्या जागेचा विकास करणे सुरु आहे. दिनांक २३.०८.२०२१ रोजी सोमवारला प्रभुजी मेश्राम यांचे निवासस्थानी मंडळाची सभा घेण्यात आली व चबुतरा निर्माण करण्याचे ठरविण्यात आले, निळा झेंडाच्या नियोजित जागेच्या बाजूचे घर असलेले विकृत मानसिकता असलेले समाजकंटक झेंड्याला विरोध करुन बौद्ध समाजाबद्धल अपशब्ध बोलून झेंडा चबूतरा बांधकामासाठी आणलेल्या विटा फेक-फाक केल्या या ठिकाणी काही करायचे नाही अशा प्रकारे बोलून दाखविले.
दिनांक २९/०८/२०२१ रविवारला सकाळी १०.०० ते १२.०० वाजताच्या दरम्यान शांतीदुत परिवर्तन बौद्ध मंडळाच्या धम्म ध्वजाची अवमानना करण्याचे कृत्य करीत दिनेश पोरशेट्टीवार व त्यांचे वडील नितेश भक्त व इतर समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चबुतल्यावर चप्पल, जोडे ठेऊन बौद्ध समाजातील बांधवाना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. व जातीय तेढ निर्माण केली जात आहे. गुंड प्रवृत्तीने वागून बौद्ध समाजातील लोकांना मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या लोकांवर कायदेशीररित्या कार्यवाही करण्यात यावी, या बाबत एक निवेदन रामनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना देण्यात आले.
निवेदन देताना ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा सल्लागार संतोष डांगे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते भैय्याजी मानकर, शांतीदुत परिवर्तन बौद्ध मंडळाचे अध्यक्ष प्रभु मेश्राम, उपाध्यक्ष राजेद्र गेडाम, नामदेव बोधुले, नंदकुमार कांबळे आदींची उपस्थिती होती.
बंगाली कॅम्प फुकटनगर चौकातील धम्म ध्वजाचा अवमान करुन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 01, 2021
Rating:
