सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा मुहूर्त म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर-मोरवा येथे (ता.8 एप्रिल) रोजी मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ह्या सभेला विदर्भातून भाजपा समर्थकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
तत्पूर्वी मंचकावर असलेले तथा भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून बोलताना अश्लीलतेचा कळस गाठला,किंबहुना त्यांची हजारो जनतेच्या समोर जीभ घरसली असल्याचे क्लिप वायरल झाल्याने राजकीय वर्तुळात वातावरण गरम झाल्याचे दिसून येत आहे. समाज माध्यमावर वायरल होत असलेल्या क्लिप मध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर जोरदार टिका करत बोलताना दिसून येत आहे की, काँग्रेस पक्षाने बहिणीला भावासोबत कपडे काढून बेडवर झोपवले,असे घृणास्पद वक्तव्य करून आपल्या कुसंस्कृतीचा व पराभवाचा परिचय करून दिला. अशा संतप्त भावना व्यक्त जन सामान्यातून होत आहे. खास करून महिला वर्गातून होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर बहीण भावाच्या नात्याला कलंकित करणारे विधान करून ते सोमवारपासून समाज माध्यमातून जोरदार 'ट्रोल' होतांना दिसत आहे.
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट आणि शिवसेना व मित्र पक्ष) महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची येथे थेट लढत इंडिया आघाडीचा प्रतिभा धानोरकर यांच्याशी आहे. मुनगंटीवार यांना विजयाचे बळ देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेचं चंद्रपुरात आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे,मुनगंटीवार यांना अगदी आग्रहाने भाजपाने चंद्रपूर लोकसभेची उमदेवारी दिली आहे, असे ते अगोदरच म्हणाले असल्याचे विविध वृत्तांकनातून असे समोर आले होते. कारण या मतदार संघात गत निवडणुकीत भाजपाचे उमदेवार हंसराज अहिर यांचा मोदी लाट असताना देखील पराभव झाला होता. परिणामी यंदा येथे भाजपाचा झेंडा फडकवायचाच असा द्दढनिश्चिय पक्षाने केला आहे आणि त्याद्दष्टीने मोदी यांची ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.सुधीर मुनगंटीवार, आ.अशोक नेते, ओबीसी आयोगाचे चे हंसराज अहिर,ओबीसी नेते अशोक जिवतोडे, आ संजीवरेड्डी बोदकुरवार वणी विधानसभा क्षेत्र, भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे,यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती. तूर्तास होऊ घातलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा पहिल्या सभेचा मुहूर्तावर चंद्रपूर येथे मोंदी यांची चंद्रपूर येथे सभा आयोजित केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सभेला येण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस वर टिकेचा जोरदार प्रहार करत "काँग्रेस पक्षाने बहिणीला भावासोबत कपडे काढुन झोपविले" असे, घृणास्पद वक्तव्य केल्याने याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले असून सुधीर मुनगंटीवारांना समाज माध्यमातून देखील निषेध केला जात असून त्यांना जनतेकडून व्यक्त होत असलेल्या तीव्र प्रतिक्रिया व ट्रोलिंग ला सामोरे जावे लागत आहे. त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे मोदींना प्रचारासाठी यावे लागत असून भाजपाचे उमेदवार आपल्या प्रचारात अश्लीलतेचा ते कळस गाठत आहे, अशी चर्चा होत आहे. गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत मुनगंटीवार यांचा तीव्र निषेध व त्यांचेवर कारवाईची मागणी वणी मारेगाव येथील महिला वर्गातून केली आहे.