सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चंद्रपूर : दिव्यांग आनंद साव यांना नुकतीच मुंबई येथील आयकर विभागात नोकरी मिळाली. दिव्यांग आनंद साव याला सात आठ महिन्यापूर्वी क्षय रोगाने ग्रासले होते. त्यावेळी त्याला त्याच्या इलाजासोबत पोषक आहाराची सक्त गरज होती. दिव्यांग आनंद चे वडील वृद्ध व त्यांची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्यामुळे ते त्याला पाहिजे तसा पोशाख आहार देऊ शकत नव्हते, ही बाब आरोग्य विभागाच्या लक्षात आली असता त्यांनी श्री.अनिल डोंगरे उपसरपंच यांना माहिती दिली. श्री.डोंगरे यांनी लगेच दिव्यांग आनंद साव ला सहा महिन्याचा पोषक आहार देण्याची जबाबदारी घेतली. त्या पोषक आहारामुळे दिव्यांग आनंद ची तब्येत सुदृढ झाली आणि आयकर विभागाच्या नोकरी करिता चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागला त्याने आयकर विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून पास झाला.
दिव्यांग आनंद ने नोकरी मिळवली,मुंबईवरून आपल्या गावाला परत आल्यावर आनंद साव ने लगेच श्री.अनिल डोंगरे यांचे घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली त्यांना मिठाई देऊन त्यांचे आभार व धन्यवाद मानले. आपण नेहमीच दिव्यांग असो की गरीब,निराधार व्यक्ती असो त्याच्या मदतीला धावून येतात माझ्या तब्बेतीची वेळी आपण धावून आले, मला मदत केली त्यामुळे मी अभ्यास करू शकलो व मी नोकरी मिळू शकलो, जर माझ्या तब्बेतीची वेळी आपण धावून आले नसता तर, कदाचित नोकरीच्या परीक्षेसाठी मी बसू शकलो नसतो. नोकरी साठी पात्र ठरू शकलो नसतो असे, यावेळी दिव्यांग आनंद साव ने त्यांच्या भेटी दरम्यान बोलून दाखवले.
एक दिव्यांग व्यक्ती आपण केलेल्या मदतीच्या कार्यातून धन्यवाद आभार मानते, यासारखे दुसरे पुण्याचे मोठे कार्य असू शकत नाही. माझ्या मनाला खूप समाधान वाटले असेच माझ्या हातून नेहमी सेवेचे कार्य होत राहणार असे श्री.अनिल भाऊ डोंगरे यांनी यावेळी सांगितले.