तलाठ्याच्या हयगयमुळे कात्री येथील अनेक पूरग्रस्त कुटुंब सानुग्रह अनुदान लाभापासून वंचित - जिल्हाधिकारी यांनी लक्ष दयावे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कळंब : कळंब  तालुक्यात कात्री येथे अतिवृष्टी व पुराने थैमान घातले असून शेतकऱ्यासह ग्रामस्थ या नैसर्गिक कोपाला वैतागले असून या पुरा मुळे अनेक कुटुंब व शेतकत्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे
नैर्सगिक आपत्तीच्या वेळी तलाठयानी मुख्यलयी राहुन सर्वेक्षण करण्याचे तलाठी यांचे कर्तव्य आहे. परंतु मुख्यालयी राहत नसल्यामुळे सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. त्यामुळे गावातील अनेक पात्र कुटुंब शासनाच्या सानुग्रह अनुदान व मदती पासून वंचित असल्याचे गावातील नागरीका मध्ये असंतोष पसरलेला आहे .

तलाठी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामवासीयांचा  तलाठ्याशी संपर्क होत नाही त्या मुळे लोकांना काही समस्या, अडचन निर्माण झाल्यास कुठे संपर्क करावा असा गावातील नागरीकांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे.
तरी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी  गांभीर्याने दखल घेऊन पूरग्रस्त कुटुंब व शेतकरी यांचा पुर्ण सर्वेक्षण करून पुरग्रस्त कुटुंबाला शासणा कडुन सानुग्रह अनुदान व मदत दयावी  अशी मागणी राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात केली आहे.