शेतात रानडुकराने घातला धुडगूस; पिकांचे केले नुकसान

सह्याद्री चौफेर | नितेश वनकर 

मारेगाव : मच्छिन्द्रा शिवारातील राज्य मार्गांलगत असलेल्या शेतात रानडूधुडगूस घालून कपाशी चे मोठ्या प्रमाणात नासधूस करून नुकसान केली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून, झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.

मारेगाव तालुक्यात सध्या वाघाचा धुमाकूळ असतांना रानडुकरांनी धुडगूस घालणे सुरु केल्याने उभ्या पिकांचे नासाडी करतांना दिसत आहे. रामदास गणपत वडस्कर यांच्या शेतातील जवळपास अर्धा ते एक एकर खाण्यासाठी कपाशी चे मोठे नुकसान करून जमीनदोस्त करून खात असल्याने उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


रान डुकराच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेयकुटीस आला आहे. शेतकरी आपल्या शेतात रान डुकराचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या कलप्त्या लढविताना दिसत आहे. गावातील शेतात लोकांनी राखण करण्याचे उपाय केले आहेत. रात्री पिपा वाजवणे,फटाके फोडतात, विविध आवाजाची म्युजिक वाजवण्यात येतात तरीही शेतकऱ्यांची नजर चुकवून शेती फस्त केली जाते. संबंधित विभागाने शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रामदास गणपत वडस्कर यांनी केली आहे.

शेतात रानडुकराने घातला धुडगूस; पिकांचे केले नुकसान शेतात रानडुकराने घातला धुडगूस; पिकांचे केले नुकसान Reviewed by सह्याद्री चौफेर on November 29, 2022 Rating: 5
Powered by Blogger.