मारेगाव : वणी नांदेपेरा मार्डी या राज्यमार्गांवर जड वाहतुकीस मनाई असतांना देखील या मार्गांवर जड वाहतूक होतेय..तेही अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून वाहतूक सुरूच आहे. खैरीहून मार्डी मार्गे वणीकडे कोळसाने भरलेला ट्रक मार्डीजवळ पलटी झाला. ही घटना आज दि. 2 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे नसल्याचे वृत्त समोर आली.
वणी नांदेपेरा मार्डी या मार्गावर चक्का जाम, गाडी फसणे, हे प्रकार नित्याचेच झाले आहे. शिवाय भीषण अपघात घडत असल्यामुळे प्रशासनाने यावर योग्य ती उपाययोजना करावी, जड वाहतूक बंद करावी अशी मागणी या मार्गांवर वसलेल्या गावाकऱ्यांची आहे. तूर्तास उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश जारी करून सुद्धा हे मुजोर वाहनधारक या मार्गाने वाहतूक करित आहे. यात नागरिकांना त्रास व जीव गमवावा लागत आहेच, पण वाहन धारकांनाही अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनाई असलेल्या मार्गाने जड वाहनधारकाने जाऊ नये अशा तीव्र भावनाही व्यक्त होत आहे.
आज दि. 2 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान, (MH-40 BG-1722) क्रमांकाचा एक ट्रक भरधाव वेगाने मार्डीकडे येत होता. अशातच मार्डीजवळील खैरी रोडला असलेल्या जिनिंगजवळील वळणावर हा लांब पल्याचा ट्रक पलटला. या ट्रकमध्ये असलेला कोळसा हा रोड च्या बाजूला असलेल्या नालीमध्ये गेला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र,ट्रक पलटी होताच वाहनचालक वाहन सोडून फरार झाला. जड वाहणाचा भरधाव वेग आणि रोडवरील वळण या फंद्यात ट्रक पलटी झाला असा असल्याचा कयास अनेकांकडून वर्तविला जात होता.