टॉप बातम्या

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या किनवट तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

किनवट : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तालुका कार्यकारिणीची नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड, मराठवाडा युवा अध्यक्ष मारोतराव झम्पलवाड, जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे, भोकर तालुका उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड, पत्रकार सुभाष नाईक, भोकरचे अनिल डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव नसीर तगाले यांनी केले. तर तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी एक वर्षात संघटनेने केलेल्या कामाचा आढावा सांगितला. याप्रसंगी अनेक पत्रकारांनी तीन वर्षाच्या कार्यकाळात संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने आपल्याला कशा पद्धतीने मदत केली. याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघाच्या किनवट तालुका युवा अध्यक्षपदी पत्रकार प्रणय कोवे, माहूर तालुका युवा अध्यक्षपदी शेख राजिक (वाई) तर माहूर तालुका अध्यक्षपदी फिरोज पठाण यांची एकमताने निवड करण्यात आली.

 तसेच किनवट तालुका कार्यकारिणीत नवीन सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. व निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे ३० ऑक्टोबर, २०२२ रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा मराठवाडा विभागीय भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड यांनी माहिती देऊन सर्वांना निमंत्रित केले. या मेळाव्यात समाजात चांगले काम करणाऱ्या सर्व क्षेत्रातील योग्य व्यक्तींचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. या बैठकीचे निवेदन पत्रकार विशाल गिमेकर तर आभार तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केले.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके, नसीर तगाले, शेख फारूक आतिफ भाई, प्रणय कोवे, मारोती देवकते, राज माहुरकर, विशाल गिमेकर, सय्यद नदीम, राजेश पाटील, रमेश परचाके, बाबुराव वावळे,सुहास मुंडे, लखन जाधव, सत्कार महामुने, लक्ष्मण सदाशिव, शेख राजिक शेख शब्बीर, चंद्रकांत कागणे, रावसाहेब कदम, किरण कुमार वानखेडे, विशाल भालेराव, जितेंद्र चव्हाण, विजय वाघमारे, गंगाधर कदम, सलमान खान, अरविंद सूर्यवंशी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();