मारेगाव : ऐन दसऱ्याचा सण सर्वत्र साजरा होत असतांना मात्र, दुःखद घटना तालुक्यातील म्हैसदोडका येथे घडली. येथील एका साठ वर्षीय महिलेने राहत्या घरी विष प्राशन केल्याची घटना आज बुधवार ला दुपार 1.30 वाजताचे सुमारास घडली आहे.
लता मनोहर डाहुले रा. म्हैसदोडके असे स्वगृही विष प्राशन केले. लगेचच उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान महिलेचचा मृत्यू झाला. आणि डाहुले परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.
मृतक लता यांचे पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. दिवासेंदिवस आत्महत्ये च्या घटनेत वाढ होत असल्याने प्रशासनस्तरावरून जनजागृती करणे आवश्यक झाले आल्याचे बोलल्या जात आहे.