वणी : तालुक्यात दि.7 ऑगस्ट पासून सर्वत्र संततधार पाऊस सुरु आहे. अप्पर वर्धा प्रकल्प,निम्न वर्धा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, व इसापूर प्रकल्पातून विसर्ग वाढल्याने वर्धा नदी वरील पटाळा पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. वणी ते वरोरा-चंद्रपूर मार्ग बॅरिकेट लावून बंद करण्यात आला असून चंद्रपूर वरोरा जाणारी वाहतूक घुग्गुस मार्गे वळविण्यात आली आहे. या मार्गांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी वणी पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला आहे.
नुकतेच हाती आलेले पाटाळा पुलाचे काही क्षण चित्र