तर... भाजपाचा झेंडा यंदा फडकवू- अ‍ॅड. प्रफुल चौहान


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : भारतीय जनता पार्टी,च्या वतीने संकल्प ते सिद्धी कार्यक्रम देश, राज्य व जिल्हा स्तरावर राबविण्यात आला, या कार्यक्रमाची सांगता वसंत जिनिंग हॉल येथील आयोजित कार्यक्रमात करण्यात आली.

या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चौहान यांचे वणी शहरात प्रथमच आगमनानिमित्त त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आले. तसेच वणी विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचाही सत्कार केला. त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती,यावेळी मोदी सरकार चे 11 वर्ष यावर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चौहान यांनी प्रोटोकॉल नुसार माहिती दिली. परिषदेच्या शेवटी आम्ही होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ह्या युती झाली तर ठीक; नाहीतर स्वबळावर लढू, आमचे सिस्टीम रेडी आहे. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुढं पत्रकारांच्या प्रश्न उत्तराला सामोरे जाताना ते म्हणाले की, कर्जमाफी मिळेल. शंभर टक्के मिळेल, सरकारने जो जो शब्द दिला तो तो आम्ही पाळला.प्रत्येक जनाची गरज समजून हे सरकार पाऊल टाकतेय असेही ते म्हणाले.

पत्रपरिषदेला माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हा सरचिटणीस रविजी बेलूरकर, मंडळ अध्यक्ष अविनाश लांबट, नितीन वासेकर, श्रीकांत पोटदुखे आदी उपस्थित होते.

बुरांडा ते खापरी रस्त्याची झाली चाळण, उर्वरित काम पूर्ण करण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : गावाकडे जाणारा बुरांडा ते खापरी हा एकमेव मार्ग असुन या मार्गाची चाळण झालेली आहे. बुरांडा ते खापरी हा अडीच किमीचा रस्ता असून त्यापैकी जवळपास 2 किमी अंतराच्या रस्त्याचे काम झालेले आहे. अर्धा किमीच्या रस्त्याचे काम अजून बाकी आहे. सध्या तालुक्यात पाऊस सुरु आहेत आणि त्यामुळे या मार्गांवरून वाहतूक करणे प्रवाश्याना व स्थानिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

खापरी ते बुरांडा रस्ता हा दोन वर्षा पूर्वी सतरा वर्षांनंतर तयार करण्यात आला आहेत. पण तो ही केवळ 2 किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे. सध्या तालुक्यात पावसाने जोर धरला असल्याने त्या पावसामुळे ह्या रस्त्याची अर्धा किमी जवळपास अतिशय दयनीय बिकट अवस्था झाली आहे, ह्या रस्त्यावर वाहन चालवीने कठीण झाले असून पायदळ चालणे सुद्धा अवघड आहे असं नागरिकांतून बोलल्या जातं.

सदर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असून उर्वरीत अर्धा किलोमीटरचा रस्ता तातडीने पूर्ण करण्यात यावा अशी मागणी गावातील नागरिकांची आहे.

डॉ. प्रियांका भोयर (खुंटेमाटे) यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : डॉ प्रियांका संतोष भोयर यांचे गुरुवार दि. 26/06/2025 रोजी झोपेतच निधन झाले. ही दुःखद घटना शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली होती. शवविच्छेदनानंतर त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी दुपारी वणी येथील मोक्षधाम करण्यात आला. त्यांच्या पश्चात पती, सात वर्षाची मुलगी आहे.

वणी- कायर मार्गावर ठेवलेली दुचाकी लंपास

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुडगूस घातला असून रस्त्याच्या कडेला ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. वणी- कायर मार्गावर बुधवार (दि. 25) जून रोजी दुपारी दिड ते दोन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत दुचाकी चोरीची तक्रार वणी पोलिसात दिली आहे. 

फिर्यादी सुनील सुभाष वाघडकर (वय 32), रा. गोकुळ नगर वणी हे शेती व्यवसाय करतात. ते नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी दहा वाजता आपली दुचाकी क्रमांक MH-29 AV- 6362 घेऊन वाघदरा परिसरात असलेल्या आपल्या शेतात गेले होते. वणी - कायर मार्गावरील खामणकर यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला त्यांनी आपली डीलक्स कंपनीची मोटारसायकल ठेवून आपल्या शेतात गेले. शेतातील कामे आटोपून दुपारी दिड ते दोन वाजता घराकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही. 

आजुबाजूला शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने शेवटी सुनील वाघडकर यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन शोध घेत आहे.

विशेष म्हणजे वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुडगूस घातला असून पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. 

झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील साखरा येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारला दुपारी 2 वाजता उघडकीस आली. 

बबन जोगीराम परचाके (अंदाजे वय 40) रा. साखरा असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्ती चे नाव आहे.  

आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान ते घराबाहेर गेले होते. दुपारी दोन वाजताच्या च्या सुमारास बबन यांचा मृतदेह गावशेजारी असलेल्या एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह त्यांच्या मुलाला आढळला. याबाबत त्याने इतरांना माहिती दिली. 

बबन याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळले नसून पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळाचा पंचनामा केला. बबन यांच्या पाठीमागे दोन मुलं, पत्नी व आई असा बराच मोठा आप्त परिवार आहे.