पांढरं सोनं काही वेळात झाले काळं


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

मारेगाव : तालुक्यातील लाखापूर येथील दोन युवा शेतकऱ्याचे पांढरं सोनं काही वेळात काळं झाले. ही घटना आज दुपारी 2 ते 2.30 वा. च्या दरम्यान, घडली. सदर  शेतकऱ्यांचा कापूस जळून खाक झाल्याची माहिती आहे.

मारेगाव तालुक्यातील लाखापूर येथील युवा शेतकरी प्रवीण बलकी यांच्या मालकीचे कापूस घरात जागा नसल्याने बाहेर अंगणात साठवून ठेवण्यात आला होता, आज गुरुवार दि.2 फेब्रुवारी ला दुपारी 2 ते 2.30 वा. च्या दरम्यान अचानक कापसाला आग लागली. कापसाला आग लागल्याचे लक्षात येताच आग पाण्याने विझवण्यात अली. परंतु तोपर्यंत प्रवीण बलकी यांचा अंदाजे नऊ ते दहा क्विंटल कापूस जळाला. तसेच त्यांचे लहान बंधू जगदीश माधव बलकी यांच्या ही मालकीचा अंदाजे जवळपास पाच क्विंटल कापूस जळाला असल्याचे समजते. सध्या कापसाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार भाव वाढेल या आशेने राखून ठेवला आहे. आज कापसाचा भाव वाढेल, उद्या कापसाचा भाव वाढेल म्हणून दोनही शेतकऱ्यांनी जागा नसल्याने अंगणात कापूस साठवून ठेवला आहे, मात्र अचानक आग लागली आणि दोन सख्या भावाचा कापूस जळाल्याने मोठे नुकसान झाले असून, युवा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहे. अतिवृष्टी मुळे आधीच शेतकरी हतबल झाला असतांना शेतकऱ्यांना आणखीन या आगीमुळे आर्थिक फटका बसला,अंदाजे प्रवीण यांचा दहा क्विंटल तर जगदीश यांचा पाच क्विंटल कापूस जळाला. दोघा मिळून अंदाजे 1 लाखाच्या वर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

सदर घटनेबाबत स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाला कळविण्यात आले, परिणामी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.

वणी वरोरा मार्गांवर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर




सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आज सकाळी आठ वाजता चे सुमारास वणी वरोरा मार्गांवर जोरदार समोरून येणाऱ्या ट्रेलर ला धडकली. यात एक ठार तर एक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले. अपघात एवढा भीषण होता की, ट्रेलरची कॅबिन पूर्णतः चकणाचुर झाली. 

प्राप्त माहितीनुसार आज गुरुवारी सकाळी 8. वा.चे सुमारास वणी वरोरा रोडवरील नायगाव पेट्रोल पंप च्या समोर टँकर चा टायर फुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रेलर वर टँकर आदळली. या भीषण झालेल्या अपघातात टँकर चालक मौला अली मेहमूद शेख (42) रा.जळकोट, जळकोट (एनएल डी), उस्मानाबाद हा जागेवर ठार झाला असून वाहन क्रमांक एम एच 40 डी 4901 या ट्रेलरचा चालक गंभीर जखमी आहे.

वणी वाहतूक शाखा प्रमुख संजय आत्राम, गोपाल हेपट आणि डफडे यांनी घटनास्थळी भेट देऊन. रोडवरील वाहने बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे. तूर्तास मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून अपघातातील ट्रेलर चालकांची अधिक माहिती मिळाली नसून, पुढील तपास वणी पोलीस करित आहे.

मारेगावातील शेळ्या,वणी चोरट्यांना यवतमाळातून अटक

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील टीनाच्या शेड मधून शेळ्या चोरून पसार झालेल्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ येथून अटक केली. अवघ्या काही तासात या धडक कारवाईने तिघे आरोपी यवतमाळ पथकाच्या सहकार्याने मारेगाव ठाण्यात गजाआड आहे.
   
मारेगाव प्रभाग क्रमांक 3 मधील फिर्यादी संजय तुरारे (38) यांच्या मालकीच्या 3 नग शेळ्या दि.31 च्या पहाटे शेड मधून चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. तुरारे यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत लक्षात आलेल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दिली. शहरातील वाढत्या घटrनाक्रम लक्षात घेत मारेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरविली. दरम्यान यवतमाळ पथकाला या घटनेबाबत पाठपुरावा केला असता, वणी येथील तीन चोरट्यांनी मारेगावातून मध्यरात्री एका टीनाच्या शेड मधून कारच्या सहाय्याने शेळ्या चोरून पसार झालेली मारुती कार क्रमांक एम.एच.34 सी. 8501 या वाहनासह तिघे थेट यवतमाळात आढळून आले.

दरम्यान,पोलिसांची यंत्रणा चौफेर मागावर असतांना यवतमाळ स्थित मारुती कार सह शेळ्या व रिच रामदास वाटेकर (19) , सुजल अजय मोरे (19) व एक विधी संघर्ष बालक हे सर्व वणी येथील रहिवाशी असून या तिघांना अवघ्या काही तासात दुपारी यवतमाळातून अटक करण्यात आले.
 किमान 80 हजाराच्या मुद्देमाल सह आरोपींना मारेगाव ठाण्यात गजाआड करण्यात आले. जिल्हा अधीक्षक डॉ पवन बनसोड, वणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, मारेगाव ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आनंद अलचेवार, संजय वारेकर, अफजल पठाण, राजू टेकाम पुढील तपास करीत आहेत.

कवी अशोकराव बेसरकर यांचे दीर्घआजाराने निधन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : कवी अशोकराव शिवाजी बेसरकर यांचे निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे 65 वर्षाचे वय होते. आज बुधवार दि. 1 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5. वाजता दीर्घआजाराने निधन झाले असून उद्या दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10. वाजता त्यांच्या निवास स्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात होईल व मोक्षधाम वणी, येथे अंत्यविधी होणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. जागृत पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बेसरकर यांचे ते वडील होते.

अशोकराव यांच्या विषयी सांगायचं झाले तर ते सामाजिक राजकीय व्यवस्थेवर तथा समाजातील अनिष्ट रूढी परंपरेवर  कवितेच्या माध्यमातून रोखठोक समाज प्रबोधनाचे कार्य केले. प्रसिद्धी च्या कोसोदूर असलेले श्री बेसरकर हे रिपब्लिकन पार्टीचे (उबाळे गट) जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणूका चांगल्या गाजवल्या होत्या. कवी अशोकराव बेसरकर हे डाव्या विचारसरणी चे होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी झोकून दिलं होत...




आजचे राशी भविष्य : बुधवार 1 फेब्रुवारी 2023


                 ⚛️ राशीभविष्य: १ फेब्रुवारी बुधवार..

🐏 मेष :
आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. लेखक व कलाकारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपार नंतर मात्र चिंता वाढतील व त्यामुळे उत्साह कमी होईल. हळवेपणा वाढेल. मित्रांसमवेत प्रवासाचे बेत आखाल. अर्थविषयक कामे कराल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल.

🦬 वृषभ :
आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया आपण उत्साहित राहाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. दुपार नंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात अडचणी येतील व त्यामुळे आलेली एखादी संधी हातून निसटेल. आपल्या हटवादीपणामुळे इतरांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. शक्यतो नवे कार्य दुपारपूर्वी पूर्ण करा. भावंडांशी आपुलकी वाढल्याने अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.

👩‍❤️‍👨 मिथुन :
आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक व्यग्रता जाणवेल. दुपार नंतर कामाचा उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनावर खर्च कराल.

🦀 कर्क :
आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. एखादा अपघात संभवतो.

🦁 सिंह :
आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. प्राप्तीत वाढ होईल. छोटा पण आनंददायी प्रवास होईल.

👩🏻 कन्या :
आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दुपार नंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील. नोकरीत मिळालेल्या बढतीमुळे लाभ होईल. सामाजिक मान - सन्मान मिळाल्याने मन प्रसन्न होईल.

⚖️ तूळ :
आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आळस व कामाचा व्याप ह्यामुळे मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने बाहेरील पदार्थ खाऊ नका. प्रवासात अडचणी येतील. पण दुपार नंतर मात्र परदेशस्थ मित्र व संबंधितांकडून काही चांगली बातमी आल्याने आपला आनंद द्विगुणित होईल. नवीन कार्यारंभाच्या दृष्टीने पण आजचा दिवस उत्साह वर्धक आहे. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे.

🦂 वृश्चिक :
आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. आप्तांसह सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकाल. एखादा प्रवास संभवतो. दुपार नंतर आरोग्य विषयक तक्रारी उदभवतील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रवासात त्रास संभवतो.

🏹 धनु :
आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले नसतानाही प्रलंबित कामे आपण पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आप्तेष्टांशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल. सामाजिक कार्यात यश प्राप्ती होईल. व्यवसाय वृद्धी होईल.

🦐 मकर :
आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आपल्या वक्तृत्व शैलीने इतरांना प्रभावित कराल. गोड बोलून नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल. आर्थिक नियोजनात यशस्वी व्हाल. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळवू शकाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कामे पूर्ण होऊ शकतील. एकंदरीत आजचा दिवस आनंददायी ठरेल.

🍯 कुंभ :
आपल्या राशी पासून चंद्र चवथ्या स्थानी आहे. विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळे कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सबब शक्यतो बाहेरचे खाणे- पिणे टाळा. लेखन- वाचन यांत गोडी वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

🦈 मीन :
आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. संततीसाठी अनुकूल दिवस. पित्याकडून लाभ होईल.