10 वी -12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एवढ्या टक्के उपस्थिती असली तरच मिळणार परीक्षेची प्रवेशपत्रे..

सह्याद्री चौफेर | न्यूज 

पुणे : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा नियम बंधनकारक नव्हता. मात्र, मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती असणं बंधनकारक आहे.

शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जातील. सर्व शाळा-महाविद्यालयांना शिक्षण विभागाने तसे आदेश दिले आहेत.

प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना
शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी. विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत शिक्षक, विद्यार्थी, पालकांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

'सीबीएसई' बोर्डाने यापूर्वी 18 जुलैला देशभरातील शाळांना परिपत्रक पाठवून विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याची सूचना केली होती. त्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळानेही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळेला सतत दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.


सोनेगाव येथील माहिलेचा सर्पदंशाने मृत्यू

सह्याद्री चौफेर | न्यूज 
9011152179

वणी : मौजा सोनेगाव येथील अंदाजे 52 वर्षीय माहिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
शोभा रामभाऊ पेंदोर रा. सोनेगाव असे मृतक महिलेचे नाव आहे.

प्राथमिक माहिती असे की, दिनांक 5 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1. ते 2. चे दरम्यान आपल्या राहत्या घरी सर्पदंश झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी उपकेंद्र घोंसा येथे दाखल करण्यात आले. परंतु त्यांना पुढील उपचारार्थ शासकीय रुग्णालय वणी येथे दाखल करण्यात आले. शनिवार दि. 5/11/2022 रोजी रात्री अंदाजे 11. वाजताच्या दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. 

🔯 राशीभविष्य: 6 नोव्हेंबर रविवार

                      आजचे राशीभविष्य 

🐏 मेष 
आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेच्छुकांना यश मिळेल.
🦬 वृषभ 
आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. व्यापार - व्यवसायात यश मिळवू शकाल. आपल्या कामगिरीचे कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर खुश होतील. 
👩‍❤️‍👨 मिथुन 
आज प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असेल. 

🦀 कर्क 
आज अवैध व निषेधार्ह विचारां पासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. संतती विषयक चिंता निर्माण होईल. 
🦁 सिंह 
आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र व संबंधितांसह हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील. 

👧🏻 कन्या 
आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्नता जाणवेल. 
⚖️ तूळ 
आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. आज शक्यतो प्रवास टाळावा. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता आहे. दुपार नंतर कामे यशस्वी झाल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. 

🦂 वृश्चिक 
आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटतील. आज नवीन वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने ह्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. 
🏹 धनु
आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मित्र व स्वकीयांसह वेळेचा सदुपयोग आनंददायी वातावरणात करू शकाल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक दृष्टया आपण बेचैन राहाल. 

🦌 मकर 
आज वाद होण्याची शक्यता आहे. आज एखाद्या धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपार नंतर मन प्रफुल्लित राहील. शारीरिक स्वास्थ्य मिळेल. 
🍯 कुंभ 
आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. 

🦈  मीन
आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. आज वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुता निर्माण होईल.

जाहिरातीसाठी संपर्क : 9011152179/7218187198


सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाबारावजी किर्तीवार सप्तनीक सत्कार

सह्याद्री चौफेर | न्यूज 
9011152179

यवतमाळ : जलाराम मंदिर मेन रोड, घाटंजी येथे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी बाबाराव रामचंद्र किर्तीवार त्यांचा घाटंजी शिंपी समाज, संस्थाच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती उत्सव सोहळ्यानिमित्ताने सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री दिनकर दमकोंडावार साहेब ((PSI) पुसद, श्री संजय रापत्तीवार साहेब (PSI) यवतमाळ, मा श्री सुनीताताई काळे मॅडम, यवतमाळ (ओबीसी  सामाजिक कार्यकर्त्या) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल अक्केवार (शिंपी समाज अध्यक्ष, वणी) हे अध्यक्ष स्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रवि वांड॒सकर (शिंपी समाज संघर्ष समिती अध्यक्ष महा. राज्य) दारव्हा, श्री दिपक दीकुंडवार (वणी), श्री नंदू गटलेवार (वणी), सौ. शामल आक्केवार (मुकुटबन), श्री चंद्रशेखर नोमूलवार (शिंपी समाज अध्यक्ष घाटंजी), मा श्री राजू दीकुंडवार (माजी अध्यक्ष घाटंजी), सौ कविता ताई कर्णेवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

सर्वप्रथम श्री संत शिरोमणी नामदेव महाराज्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाबारावजी किर्तीवार साहेब यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्तींनी व मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी समाजातील गणमान्य व्यक्ती, घाटंजी शिंपी समाज, संस्था, घाटंजी जिल्हा यवतमाळ येथील सर्व समाजातील पदाधिकारी,कर्मचारी व कार्यकर्ते, बंधू भगिनी उपस्थित होते. आभार प्रदर्शनंतर स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आज वसंत जिनिंगचे मतदान होणार, रंगनाथ च्या पुनःरावृत्तीचे संकेत

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : दि वसंत जिनिंग या सहकार क्षेत्रातील नामवंत संस्थेची निवडणूक आज दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी होत आहे. 17 संचालक पदासाठी होणाऱ्या या निवडणुकीत 67 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. अर्ध्या शतकाहून अधिक उमेदवार उभे ठाकले आहेत. त्यांचं आज भवितव्य मतदान पार पडल्यावर निकालानंतर ठरणार आहे. 

विद्यमान आमदार, माजी आमदार, आणि सहकार क्षेत्रात असलेले मातब्बर वसंत साठी उभे ठाकले असल्याने मोठीच रंगतदार होणार आहे. परंतु यात 'सहकार'च्या बाजूने मतदारांचा कौल असल्याचे दिसून येत आहे.

"विजयी होणार.. निवडून येणार.. होऊ द्या कितीबी काय.. पुन्हा गुलाल आपलाच हाय... अमदा धुराळा आपलाच हाय" असे, एकंदरीत विजयाचे वातावरण निर्माण झाले असून एकूणच आजी,माजी यांचे पानिपत होणार असे चित्र दिसते आहे. तसें यात काही मुरब्बी उमेदवार मतविभाजनात जिंकून येण्याची शक्यता आहे. "रंगनाथ"ची पुनरावृत्तीचेच संकेत दिसून येत आहे. तूर्तास मतदार राजा उतरला मैदानात...!