प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती संपन्न...


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

जिबगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथे आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती संपन्न करण्यात आली.

यावेळी श्री राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य. डॉ.ऐश्वर्या गेडाम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव, धनश्री सिस्टर, उमेश गोलेपल्लीवार, भुमिका उईके, नागेश बारसागडे, सुरज मंडोगडे, संजय उईके, उपस्थित होते.

यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश गोलेपल्लीवार यांनी केले तर, आभार डॉ ऐश्वर्या गेडाम मॅडम यांनी मानले.

जागतिक कवक दिन साजरा करण्यात आला

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव जि. यवतमाळ येथे, दि. 26/09/22 रोजी वनस्पतीशास्त्र विभागा तर्फे जागतिक कवक दिन साजरा केला.

या कार्यक्रमात बी. एस. सी. भाग 1, 2 व 3 च्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या परिसरात विशिष्ठ ठिकाणी असलेल्या कवकाबद्दल प्रा. माकडे, प्रा. भांदक्कर व प्रा. डॉ. आडसरे यांनी माहिती दिली. प्रत्यक्ष नैसर्गिक अधिवासातील कवकाच्या प्रजातींचे निरीक्षण व पाहणी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख, प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी कार्यक्रमाला परवानगी देवून कौतुक केले.
या कार्यक्रमाकरीता श्री. आकाश कुमरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

शि. प्र. मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती संपन्न

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न करण्यात आली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री क्षीरसागर सर व उपप्राचार्य श्री तामगाडगे सर उपस्थित होते यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवाळकर सर यांनी केले तर आभार सौ कचवे मॅडम यांनी मानले.
(जयंती साजरी करतांना सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग )

जिबगांव येथे आरोग्य व नेत्र शिबिर संपन्न


 उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : खा.अशोकजी नेते यांनी सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्याने आरोग्य शिबिराच्या सत्कार समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी जिबगांव या ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेत्र तपासणी,बी पी सुगर,बाल रोग तपासणी, स्त्री रोग तपासणी आदी या शिबिरात आरोग्याची तपासणी करून प्रभावीपणे राबवल ही बाब कौतुकास्पद आहे.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोकजी नेते बोलतांना ग्रामीण भागामध्ये अशा शिबिराचे आयोजन करणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे.या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या तळागाळापर्यंत आरोग्याच्या सोयी सुविधा जनतेपर्यंत पोहोचविणे वआरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्षणे देण्याची काळजी गरज आहे.असे प्रतिपादन या प्रसंगी केले
या कार्यक्रमा प्रसंगी मान.प्रा. अतुलभाऊ देशकर,जिल्हा महामंत्री संजयजी गजभिये, तालुकाध्यक्ष तथा ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, ता आरोग्य अधिकारी अवघड मॅडम यांनी सुद्धा याप्रसंगी मार्गदर्शक केले.
 या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भा. ज. पा. तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, प्रकाश पाटील गडमवार, देवराव सा मुद्दमवार, अर्जुन भोयर,किष्णा राऊत, पुरुषोत्तम चुदरी सरपंच ग्रा प.जिबगाव राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य माजी प स सभापती छायाताई शेंडे,ग्रा प सदस्य सौ दिक्षा भोयर, ग्रा प सदस्य सौ मोणीका उडिरवाडे,ग्रा प सचिव आशिष आकनुरवार, अंकुश भोपये युवा कार्यकर्ते, दिवाकर गेडाम,दिलीप चुदरी,अशोक पाल, पुरुषोत्तम भोयर,डॉ गोबाडे, डॉ ऐश्र्वर्या गेडाम वैद्यकीय अधिकारी प्रा आरोग्य केंद्र जिबगांव,संदिप गेडाम,पारस नागापुरे उपसरपंच पारडी,लोकनाथ रायपुरे,प्रा आरोग्य केंद्र जिबगांव येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी व ग्रामीण रुग्णालय सावली येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य तालुका अधिकारी व एक दिवसीय आरोग्य शिबीरामध्ये सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांचे मा.खासदार अशोक भाऊ नेते.मा.माजी आमदार अतुल भाऊ देशकर.मा .संजयजी गजपुरे माजी जिल्हा परिषद सदस्य या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

भेसळ करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात काही उद्योजक तसेच विक्रेते अन्नधान्यांमध्ये भेसळ करून आपला माल विकत असतात. भेसळ करणाऱ्या व्यक्तीची माहिती होताच त्यांच्या आस्थापनांवर धाडी टाकून कडक कारवाई करा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त (अन्न) नितीन मोहिते, सहाय्यक आयुक्त (औषधे) उमाकांत बागमारे, औषध निरीक्षक सी. के. डांगे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण उमप, प्रफुल टोपले, गिरीश सातकर आदी उपस्थित होते.

नवरात्र, दसरा, दिवाळी तसेच इतर सणांमध्ये तेल, दूध, मिठाई, भगर, रवा, आदींचा उपयोग गोड पदार्थ करण्यासाठी केला जातो, असे सांगून मंत्री श्री. राठोड म्हणाले की, दुकानांमधील तसेच उद्योजकांच्या कंपनीमध्ये खाद्यतेलाचे नमुने नियमितपणे तपासावे. भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. यात कितीही मोठा उद्योजक असला तरी हयगय करू नये. प्रसंगी यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. पुढील महिनाभर ही मोहीम अतिशय जोमाने तसेच त्यानंतरही नियमितपणे राबवा. यासाठी विभागाने योग्य नियोजन करावे.
खाद्य तेलामध्ये भेसळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे नागरिकांना एन्जोप्लास्टी, अँजिओग्राफी आदी रोगांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात भेसळीचे प्रमाण पूर्णपणे बंद झाले पाहिजे. चंद्रपूर हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, आदी उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये काम करणारा मजूर वर्ग हा गुटखा आणि खऱ्याच्या आहारी गेला असल्याचे निदर्शनास येते. गुटखा विकणाऱ्यांवर तसेच गुटख्याची निर्मिती होते त्या ठिकाणची माहिती घेऊन उद्योजकांवर धाडी टाका. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात खदानींमध्ये गुटखा सप्लाय करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करा. येत्या 15 दिवसांत या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

सन 2021- 22 मध्ये अन्नधान्याचे 251 नमुने घेण्यात आले. यापैकी प्रमाणित 176 नमुने, कमी दर्जा असलेले 8 नमुने, मिथ्याछाप 7, असुरक्षित 19 नमुने, तर 41 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. 2022 - 23 मध्ये 169 नमुने घेण्यात आले असून यापैकी प्रमाणित 8, कमी दर्जा असलेली 0, मिथ्याछाप 2, असुरक्षित 0 आणि अहवाल प्रलंबित असलेल्या नमुन्यांची संख्या 159 आहे. प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी पाठपुरावा करून त्या तात्काळ निकाली काढाव्यात, अशा सूचनाही यांनी दिल्या.

गत दोन वर्षात विभागाच्या वतीने एकूण 23 धाडी टाकण्यात आल्या. यात 32 लक्ष 88 हजार 277 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थ बाबत 2021 - 22 मध्ये 10 प्रकरणात आठ गुन्हे नोंद, तर 2022 - 23 मध्ये आठ प्रकरणात आठ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.