वणी तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा


सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सतंतधार पावसाने चांगलीच मजल मारली आहे. या पावसामुळे जन जीवन प्रभावित झाली असून शेतकऱ्याची पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. अशातच आता नागपूर हवामान विभागाने वणी तालुक्यातील नागरिकांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवसात अतिवृष्टीचा होण्याचा इशारा वणी तालुक्यातील नागरिकांना नागपूर हवामान खात्याने दिला आहे.
त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी नदी व नाल्या जवळील नागरिकांना महत्वाचे कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नये,  कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असल्यास नागरिकांनी त्या पुलावरून वाहतूक करू नये, रांगना ते वणी या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहते तसेच तो पूल खचला असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक सदर रस्त्याने होणार नाही याची तालुक्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच नैसर्गिक आपत्ती संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
१) नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष यवतमाळ.
07232 240720
२) नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष वणी.
07239 225062
३) मा. तहसीलदार वणी मो.नं
9356809418
४) पोलीस निरीक्षक वणी.
8888825890
५) पोलीस निरीक्षक शिरपूर.
9527818484
६)पोलीस निरीक्षक मुकुटबन.
9823308230

असे नागपूर हवामान खात्याने कळविले आहे.

दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित चांगले उपचार द्या; मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

अमरावती : मेळघाटमध्ये दूषित पाण्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास खासगी रूग्णालयात दाखल करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे 50 जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ दखल घेत दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तत्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. दूषित पाण्याने बाधा झालेल्या व्यक्तींना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास त्यांना खाजगी, मोठ्या रुग्णालयात दाखल करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
दूषित पाण्याने बाधा झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू असून, आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन सतत संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळावेत, तसेच यापुढे हानी टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीचा प्रयोग अनुकरणीय – कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : पालक सचिव एकनाथ डवले यांनी नांदेड जिल्ह्यात दिनांक 8 जून रोजी विविध ठिकाणी भेटी देऊन पीक पेरणीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. कासारखेडा तालुका नांदेड येथे शेतकऱ्यांनी बेडवर टोकन पद्धतीने व बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेल्या सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांचे कौतुक व अभिनंदन त्यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामात व उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बियाणे तयार करून स्वतः यावर्षी वापरले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बीबीएफ आणि टोकन पद्धतीने पेरणी झाली असून उगवण चांगली झाली आहे. हा उपक्रम राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय असून या पद्धतीचा इतर शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी केले.
कासारखेडा हे गाव राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प अंतर्गत निवडले असून या गावात 100 हेक्टर वर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यावेळी प्रगतशील शेतकरी बाबाराव गोविंदराव आढाव, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील, सतिश सावंत, कृषी पर्यवेक्षिका शिंदे सुप्रिया तसेच कृषी सहायकांसह शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

धामदरी तालुका अर्धापूर येथील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटिकेस भेट देऊन सौ. गंगाबाई शामराव कदम या महिला शेतकऱ्याचे कौतुक केले. या ठिकाणी मागील वर्षभरात सुमारे 25 लाख भाजीपाला रोपे तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली आहेत. यामधून सदरील महिलेस सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा नफा झाला आहे अशा पद्धतीच्या रोपवाटिका जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उभाराव्यात असे आवाहन एकनाथ डवले यांनी यावेळी केले.

यावेळी धामधरी येथील महिला शेतकऱ्यांना श्री डवले यांचे हस्ते महाबीजचे भाजीपाला मिनीट बियाणे वाटप करण्यात आले. भाजीपाल्याचा महिला शेतकऱ्यांनी आपल्या आहारात व कुटुंबाच्या आहारात समावेश करावा, असेही एकनाथ डवले यांनी सांगितले. या ठिकाणी दिगांबर रामराव कदम यांचे शेतावरील बीबीएफ वरील पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, तालुका कृषि अर्धापूर संजय चातरमल, अर्धापुर तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी , शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय कदम, गावचे सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोयाबीन आणि कापूस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रती हेक्टरी सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. यावर्षी राज्य शासनामार्फत नांदेड जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत करून विविध पातळीवर शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळाच्या माध्यमातून उत्पादकता वाढ करावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 8 जुलै रोजी आयोजित कृषी विभाग व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

नांदेड जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन बियाणे मध्ये शेतकऱ्यांनी चांगले कार्य केले असून ते राज्यासाठी आदर्शवत आहे. नांदेड जिल्ह्यात या खरीप हंगामात एकुण 7.66 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले असुन जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आतापर्यंत सुमारे 87 टक्के क्षेत्रावर खरीप हंगामात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. खतांचा देखील मुबलक साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. विविध योजनांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात यावा. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी ग्राम परिवर्तन प्रकल्प म्हणजेच स्मार्ट योजना जिल्ह्यात राबविली जात असून या योजनेस गती द्यावी तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा.
नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अवजारे बँक व इतर योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ दिल्याने प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कापूस संशोधन केंद्र प्रमुख खिजर बेग, अरविंद पांडागळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, महाबीजचे अधिकारी, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळाचे अधिकारी व जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी व कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

निंबाच्या झाडावर विज कोसळली

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : शहरात आज शनिवारी झालेल्या जवळपास तीस मिनिटाच्या मुसळधार पावसात अचानक कडकडाट झाला. एक मिनिटासाठी हृदय थक्क झाले आणि समजले की, मारेगाव पंचायत समिती येथील एका निंबाच्या झाडावर विज पडली.
मागील तीन दिवसापासून तालुक्यात धुवाधार पावसाने थैमान घातले आहे. संततधार पावसाने जन जीवन प्रभावित झाले असतांना आज दुपारी पावसाने मारेगावात दमदार हजेरी लावली आणि अचानक आकाशात विजेचा कडकडाट झाला, त्यात काही सेकंदातच पंचायत समिती च्या आवारातील मायेची सावली देणाऱ्या निंबाच्या झाडावर विज कोसळली असून मोठी हानी टळली आहे.
आज दुसरा शनिवारी प्रशासकीय कामकाजाला सुट्टी असल्याने येथील पंचायत समिती कार्यलयात कोणीच नसल्याने मोठी हानी टळली. निंबाच्या झाडावर वीज कोसळून या झाडाच्या भल्या मोठ्या फांद्या दुभंगलेल्या दिसून आले.
परिणामी जीवितहानी झाली नसली तरी मात्र, विज झाडावर पडल्याने वृक्षप्रेमीत चर्चेचा विषय ठरला. 

श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशवंताचा गौरव सोहळ्याचे लातूर येथे आयोजन


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री 

लातूर : श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील सन 2022 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत 80 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा व समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा व भगिनींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले आहे तरी लातूर जिल्ह्यातील श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या गुणपत्रिकेची प्रत व समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनी आपली थोडक्यात माहिती पुढीलपैकी कोणत्याही एका व्हाट्सअप वर दिनांक 24 जुलै 2022 पर्यंत सादर करावी असे पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
संपर्क व व्हाट्सअप नंबर
1.सुदर्शन बोराडे:-7588018828
2.अनंत पांचाळ:-9850641554
3.अंगद पांचाळ:-9922929892
4.राम महामुनी:-9767350054
5.श्रीरंग पांचाळ:-9884411317
6.राम रत्नपारखी:-983485893 
7.सुधाकर दापेकर:-9921564840
8.बालाजी सुवर्णकार:-8180022149