विवाहित महिलेचा आरोप; डिमांड व्हिडीओ मजनूने केला वायरल,पोलिसात गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यातील एका ग्रामीण महिलेला फेसबुक फ़्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री व प्रेम संबंध स्थापत नंतर अश्लील व्हिडीओ काढून वायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे.  

याबाबत एका पीडित महिलेने मजनू वर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओही दुसऱ्याच्या मोबाइलवर त्याने व्हायरल केला, अशी फिर्यादीने दि. 8 जून रोजी घडलेल्या प्रकाराची 9 जून रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

वणी तालुक्यातील एका विवाहित महिलेला फ़्रेंड रिक्वेस्ट पाठवली, नंतर दोघात बोलचाल सुरु झाली यातून प्रेमाचे दिवस बहरले. या दरम्यान, महिलेला कपडे काढून नग्न अवस्थेत बघण्याची इच्छा जाहिर करत त्याने एकप्रकारे इमोशनल ब्लॅक मेल केले. तिची इच्छा नसतानाही ती भितीपोटी पिडीत महिला उघडं झाली होती, आरोपी वाजीद हुसेन (अंदाजे वय 39) रा. मोमीनपुरा, वणी याच्यावर पोलिसात कलम 75, 77, 351(2), BNS सहकलम 66 (E) IT act गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास वणी पोसीस करत आहे.




आज नेर येथे गोपाळकृष्ण,संत सेनाजी महाराज व संत नगाजी महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा



सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

यवतमाळ : नाभीक समाजाचे आराध्य दैवत गोपाळकृष्णभक्त संत श्री.नगाजी महाराज, संत श्री.सेनाजी महाराज व श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवार दि.११ / ०६ / २५ ला होणार आहे. 

मोठया प्रयत्नानंतर परिसरातील दानशूर समाजबांधव व दानशूर दात्यांच्या आर्थिक, शारीरिक व मानसिक सहभागाने मंदिराचे बांधकाम पुर्णत्वास आले. मंदिर पूर्णत्वास आल्यानंतर मूर्तिदात्यांनी मूर्तीच्या स्वरूपात मंदिरास दान दिलं.

तीन मुर्तिदाते दातृत्वाचे धनी

श्रीमती सुमित्राताई माणिकराव चिंचोळकर* यांनी त्यांचे पती स्व. माणिकरावजी चिंचोळकर यांची स्मृती कायम स्मरणात राहावी या उद्देशाने संत नगाजी महाराज यांची मूर्ती मंदिरास दान स्वरूपात दिली.

श्री दिवाकरभाऊ तुळशीराम ढोके यांनी त्यांचे वडील स्व. तुळशीरामजी ढोके यांचे स्मृती प्रीत्यर्थ श्री संत सेनाजी महाराज यांची मूर्ती मंदिरात भेट स्वरूपात दान केली.

तर श्री संजयभाऊ गोविंदराव तंबाखे यांनी त्यांचे वडील स्व. गोविंदरावजी तंबाखे यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्रीकृष्णाची मूर्ती मंदिरास दान देत त्यांच्या दातृत्वाचे दर्शन घडविले.


मूर्तिची स्थापना व प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम मंगळवार ता. १० जून, बुधवार ११ जून व गुरुवार १२ जून ह्या ३ दिवसा दरम्यान सलग विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होणार आहे. मंगळवार ता. १० ला दुपारी ४ वाजता गोपाळकृष्ण, संत सेनाजी महाराज व संत नगाजी महाराज ह्या तीनही महाराजांच्या मूर्तीची नेर शहरातून भजनाच्या गजरात भक्तीभावे दिंडी काढण्यात येइल.यामधे रुख्मिणी महिला भजन पाथ्रड गोळे, शारदा महिला भजन मंडळ नवाबपूर यांचा विशेष सहभाग असणार आहे. दिंडीनंतर रात्री ८ वा. जलाभिषेक करण्यात येइल.

बुधवार दि. ११ ला सकाळी ७. ०० वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आरंभ होईल व दुपारी १२ वाजता ह.भ.प.श्री. वासुदेव महाराज (मोहन महाराज संस्थान दाभा) यांच्या हस्ते श्री गोपाळकृष्ण,संत सेनाजी महाराज व संत नगाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येइल.व नंतर होम हवन करून मंदिर परिसर भक्तिमय होईल. रात्री ८.०० ते १० वाजता नेर येथील वारकरी भजन मंडळाच्या साथीने ह.भ.प.श्री. मधुकर महाराज पाचपुते यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल.त्या नंतर 

गुरुवार दि.१२/०६/२५ ला सकाळी १०ते१२ पर्यंत मोहन महाराज संस्थान दाभाचे गुरुवर्य ह.भ.प.श्री वासुदेव महाराज यांचे गोपाल काल्याचे कीर्तन होईल व तदनंतर मान्यवरांचा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रम पार पडेल.त्या नंतर लगेच नेर येथील *प्रज्वल आदेशराव सोनुलकर* ह्या अन्नदात्यातर्फे दु. १२ ते ४ पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

मा. संजयभाऊ राठोड ( मृद व जलसंधारन मंत्री व पालकमंत्री यवतमाळ) यांचे ह्या सोहळ्यास विशेष उपस्थितीत असणार आहे.

ह्या मंगल व धार्मिक सोहळ्यास श्री. पवनभाऊ जयस्वाल (अध्यक्ष, संत उद्धवबाबा संस्थान मानकी आंबा), श्री. प्रदीपानंद माऊली (अध्यात्मिक सेवा संस्थान, पंचवटी नेर),ह.भ.प. श्री. विठ्ठल महाराज पुनसे आळंदीकर,ह.भ.प. श्री. देवदत्त महाराज आढाव (श्रीक्षेत्र चिंतामणी, कळंब),ह.भ.प. श्री.विठोबा महाराज खानजोडे (जळगाव), ह.भ.प. श्री.अरुणभाऊ सालोडकर (आजीवन प्रचारक श्री गुरुदेव सेवा मंडळ अडगाव) वरील सर्व मान्यवरांची ह्या सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे.

ह्या भव्यदिव्य अशा नेत्रदिपक सोहळ्याला सर्व लहानथोर भाविकभक्तांनी उपस्थित राहून धार्मिक उत्सवाचा आनंद ह्याची देहा ह्याची डोळाअनुभव घेऊन भक्तीरसात तल्लीन होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे. आयोजन समितीमध्ये असलेले आणि नसलेल्या अणेक समाज व समाजेतर भक्तांनी मंदिर व हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी निःस्वार्थ परिश्रम घेतले.

नगाजीभक्त रवि घुमे मारेगाव यांच्या लेखणीतून.

विटेवरी उभा नीट कटावरी कर । 
वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ||
संत सेना महाराज.

भाजपा मारेगाव तालुकाध्यक्ष पदी अविनाश लांबट यांची दुसऱ्यांदा फेरनिवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : भारतीय जनता पक्षाकडून आज नूतन तालुकाध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये मारेगाव तालुकाध्यक्ष पदी पुन्हा एकदा अविनाश लांबट यांची निवड करण्यात आली. अविनाश लांबट यांनी गेली 2 वर्षे कुशलपणे संघटना हाताळली. या कार्यकाळात नवीन जुने भेदभाव न ठेवता सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला, तसेच सर्व नेत्यांमधील दुवा बनून सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम केले. सर्वांच्या मदतीने संघटना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. अविनाश लांबट हे कुशल संघटक आहेत. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना दुसऱ्यांदा तालुका अध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. त्यांच्या वर या निवडीने सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



प्रहार जनशक्ती पक्षाचे विविध मागण्यासाठी साखळी उपोषण सुरू...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज ९ जून रोजी तहसील कार्यालयासमोर साकळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. 

शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे,पेरणी ते कापणी पर्यंत चा खर्च एम आर इ जी एस मधून करण्यात यावा, दिव्यांग बांधवांना ६०००/रुपये मासिक मानधन देण्यात यावे, मनरेगा मधली मजुरी ५०० करण्यात यावी, शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी.अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.

उपजिल्हाप्रमुख मुबिन शेख,तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे,तालुका सचिव मुन्ना येरेकर,तालुकाप्रमुख प्रहार शेतकरी संघटना रघुवीर कारेकर,शहरप्रमुख प्रहार वाहन चालक संघटना सचिन राखुंडे उपस्थित होते.

नातेवाईकांनी नातेवाईलाच मारहाण करून केले जखमी

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यातील मंदर येथे किरकोळ कारणावरून तिघांनी मिळून नातेवाईक तरुणाला बेदम मारहाण करून धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 8 जून) सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली.

सचिन नवनाथ बुचे (वय 33, रा. मंदर, ता. वणी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत चमाजी बुचे (वय 25), काकू (वय 45), चमाजी गणपत बुचे (वय 55, तिघे रा. मंदर, ता. वणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. घराचे पायरी जवळ रोटवेटर का मारले असे विचारले असता आरोपीनी वाद घालून अनिकेत बुचे यांनी हातातील कड्याने फिर्यादी च्या काना मागील भागाला मारून जखमी केले. यात काका व काकूंनीही हाताबुक्क्याने त्यांना बेदम मारहाण केली असे तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी फिर्यादी याला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.