दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खांदला फाट्याजवळ दि.२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७. वाजता च्या दरम्यान दुर्घटना घडली.
वैभव विलास हरबडे (२५) रा. काटला बोरी, ता. कोरपना जि चंद्रपूर असे अपघातातील तरुणाचे नाव आहे. सदर तरुण हा दुचाकी क्रमांक (एम एच ३४ बि डी २७१८) कोरपना कडे जात असतांना खांदला फाट्याजवळ त्याची दुचाकी अज्ञात वाहनाला धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच ते तात्काळ अपघातस्थळी पोहचले. तूर्तास अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे.

कारचा भीषण अपघात.. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तालुक्यातील सोनापुर सामदा मार्गावर कारचालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कारचा अपघात घडला. मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की सचिन प्रभाकर कुकडे , वय 35वर्ष रा. सोंनापुर असे कार चालकाचे नाव आहे. सोनापुर- रस्त्यावरून एक कार (क्र.MH- 34 AA-8539) सामदा- व्याहाड च्या दिशेने सचिन प्रभाकर कुकडे आपल्या मुलीला कू. आराध्या कुकडे हिला स्कूल ऑफ स्कॉलर विद्यालयात उशीर होऊ नये म्हणून आपल्या कारने घेउन जात असताना नागोबा देवस्थानच्या थोड्या अंतरावर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूच्या खड्डयात कोसळली. त्यात कारचा पूर्ण चुराडा झाला.
सदर घटना हि सकाळी 7: 00 घडली असून सकाळीं फिरायला गेलेल्या युवकांच्या समोर घडली असल्याचे गाडीतील जखमींना उपचारासाठी व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. आणि तेथूनच त्यांना जिल्हा रुग्णालय गडचिरोलीला हलविण्यात आले.

कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतिची संसाधने उपलब्ध करुन देणे आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून उच्च दर्जाच्या कामाची अपेक्षा करताना त्यांना चांगल्या प्रतिची संसाधने उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागाला अद्ययावत करण्यासंदर्भात संसाधने पुरविण्याचे उचललेले पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे. इतर विभागात सुद्धा अशी अद्यावत संसाधने उपलब्ध करून देता येतील. त्यासाठी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन सी. एस आर मधुन निधी उपलब्ध करुन देता येईल,असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महसूल विभागांना संगणक व संबंधित साहित्य पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तसेच महसूल विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.

भूसंपादनाच्या दोन टक्के सेवा शुल्क निधितुन कार्यालयात अद्ययावत साधनसामग्री खरेदी, इंधन इत्यादीसाठी हा निधी खर्च करता येतो. महसूल विभागात अद्ययावत संगणक व इतर संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी या निधीतून २१० संगणक, ३० ऑल इन वन संगणक, प्रिंटर व स्कॅनर खरेदी करण्यात आले. सदर साहित्य तहसीलदार, अप्पर जिल्हाधिकारी, खनिकर्म, रोहयो, पुरवठा तसेच इतर महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वितरित करण्यात आले.

महागांव सिंधी मांगली शिवारातील कॅनलची त्वरित दुरुस्ती करा - अविनाश लांबट यांची मागणी

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मारेगाव : तालुक्यातील कॅनलमुळे गाळ साचल्याने गवत वाढले, याशिवाय ठिकठिकाणी झाडे झूडप वाढीस आलेत. त्यामुळे कॅनल च्या वरून पाणी वाहून शेतात शिरल्याने  कॅनल लगत शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
याबाबत मनसेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात संबंधित विभागाला निवेदन सादर करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु संबंधित विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करित असल्याने परत आज दि.२ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करावे लागले असे अविनाश लांबट यांनी बोलतांना सांगितले. ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांचे होणारे नुकसान त्वरित टाळावे तसेच महागांव तलाव सिंचनासाठी दिलेल्या कॅनलची पूर्ण  तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी आग्रही मागणी आमची आहे. 

मारेगाव तालुक्यातील कॅनलमुळे हातातील असणाऱ्यां शेतमालांचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित विभागाने या महागाव सिंधी, मांगली परिसरातील कॅनलची पाहणी करून तातडीने कॅनलची दुरुस्ती करावी, कॅनलच्या पाठसऱ्या ह्या अडगळीत असल्याने पाठसऱ्यातून पाणी पुरवठा योग्य तो होत नसल्याने पाणी सोडण्यासाठी योग्य माणसाची निवड करण्यात यावे, वरील सर्व मागण्या येत्या आठ दिवसात मार्गी लावल्या जाव्यात अन्यथा.. मनसे दणका आंदोलन उभारेल असा मनसेच्या वतीने ईशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीस आपण जबाबदार असाल असेही निवेदनात मनसे म्हटलं..

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष तथा सरपंच संघटना तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात बिजरतन मोहता, छायाताई देवाळकर लताताई डाहुले, रूपाताई थेरे, सिंधूताई मांडवकर, प्रियांका देवाळकर मारोती बलकी, लताताई नागोसे, अर्चना गाडगे, ज्योती डाहुले, मंगला डाहुले, अलका डाहुले, पार्वती डाहुले, रुपाली गाडगे, विष्णू भोयर, सुहास पिंपळशेंडे, सुधीर डाहुले, गणेश खुसपुरे, आशिष खंडाळकर, अंकुश वैद्य, यासह मनसे कार्यकर्ते व सिंधी महागाव येथील शेतकरी उपस्थित होते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावली येथे मतदार नोंदणी शिबीर

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तहसील कार्यालय सावली व औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 29/11/2022 रोजी नवीन व भावी मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्याकरिता शिबीर पार पडले.

सदर शिबीर तहसीलदार परीक्षित पाटील यांचे मार्गदर्शनात व नायब तहसीलदार सागर कांबळे, शिल्पनिर्दैशक बारशिंगे, यांचे उपस्थितीत पार पडले. यावेळी कांबळे यांनी मतदार नोंदणी प्रक्रिया व मतदार नोंदणीचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत तसेच ज्यांना त्यांचे वयाची 18 वर्षे 1 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्ण होणार आहेत अशा सर्वांनी मतदार नोंदणी करण्याकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन केले.

”एक मत एक मुल्य“ यावरून मताची किंमत लक्षात घेऊन ज्या काही नवीन व भावी मतदार यांनी मतदार नोंदणी करण्यासाठी नोंदणी फार्म भरुन आपली मतदार नोंदणी करावी,यामुळे आपल्याला फक्त वेगवेगळ्या होणा-या निवडणुकीसाठीच महत्त्वाचे नाही तर विविध योजना, विवाह नोंदणी, यासाठी सुद्धा मतदार ओळख पत्राची आवश्यकता असते ,त्यामुळे संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे,त्या अधिकाराचा योग्य वापर करुन लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी करण्याचे यावेळी माहिती देण्यात आली.